🌟पुर्णा तालुक्यातील देगाव शिवारात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान...!


🌟शेतातील गहु,हरभरा,ज्वारीसह संत्रा आंबा केळी आदी बागायती पिकांचेही नुकसान🌟

पुर्णा (दि.१८ मार्च) - पुर्णा तालुक्यात काल शुक्रवार दि.१७ मार्च २०२३ रोजी झालेल्या आवकाळी पाऊस व गारपिट मुळे देगाव शिवारातील शेतकऱ्यांची पिके अक्षरशः जमीन दोस्त झाल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे.


देगाव शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतांतील हाता तोंडाला आलेला घास निसर्गाने हिरावल्याचे निदर्शनास येत असून अवकाळी पाऊस व गारपिटी मुळे शेतातील गहु,हर भरा,ज्वारी आदी पिकांसह आंबा/मोसंबी/संत्री आदी बागावती पिकांचे देखील नुकसान झाले आहे देगाव शेत शिवारातील शेतकरी गंगाधर इंगोले,राजाभाऊ इंगोले, भगवान इंगोले व जिवन इंगोले यांनी तहसिलदार बोथीकर व महसुल प्रशासनाने तात्काळ नुकसानीची पाहनी करावी अशी मागणी केली आहे.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या