🌟परभणी जिल्हा आरोग्य विभागातर्फे कार्तिकी काटकरचा प्रमाणपत्र देऊन गौरव.....!


🌟कार्तिकी काटकर हिने तालुका व जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला🌟

 परभणी (दि.२५ मार्च) - राष्ट्रीय कुष्ठरोगनिर्मूलन कार्यक्रम अंतर्गत स्पर्श जनजागृती मोहिमेअंतर्गत सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग, कार्यालय परभणी यांच्या तर्फे आयोजित निबंध स्पर्धेमध्ये भारतीय बालविद्या मंदिरची विद्यार्थिनी कुमारी कार्तिकी विनायकराव काटकर हिने तालुका व जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच कुमारी अर्चिता प्रसाद कारेगावकर द्वितीय क्रमांक व कुमार आलोक सिंह भारतराव चापके याने तृतीय क्रमांक पटकावला. 

याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय परभणी यांच्यातर्फे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांचाळ, डॉ. वाघमारे, डॉ. सोनवणे यांच्या हस्ते जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय येथे प्रमाणपत्र देऊन सदर विद्यार्थ्यांचा व पालकांचा गौरव करण्यात आला. सदर विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक  आर. जी.पांचाळ , विभाग प्रमुख डी.आर. सूक्ते, श्री गरुड यांनी मार्गदर्शन केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या