🌟परभणी शहरातील व्यवसायिकांना ऑनलाईन परवाने वाटप....!


🌟व्यवसायिक परवेज अहमद राथेर यांना महापालिकेच्या प्रशासक/आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते ऑनलाईन परवाना प्रदान🌟

परभणी (दि.22 मार्च) :  महानगरपालिकेच्या वतीने सोमवार 06 मार्च पासून शहरातील व्यावसायीकांना व्यवसायासाठी ऑनलाईन परवाने वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली.

            व्यवसायिक परवेज अहमद राथेर यांना महापालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते ऑनलाईन परवाना देण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ.उत्कर्ष गुट्टे, सहाय्यक आयुक्त दशरथ राठोड माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख अदनान कादरी यांची उपस्थिती होती.

          दरम्यान, व्यवसाय परवाना शासनाच्या पोर्टलवर IWBL (integrated web baised portal) उपलब्ध असून व्यापार्‍यांनी ऑनलाईन अर्ज करुन व्यवसाय परवाना काढून घ्यावा, असे आवाहन आयुक्त सौ. सांडभोर यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या