🌟पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुन मदत केली तर आर्थिकदृष्ट्या कुटुंब सक्षम होईल - रस्मीताई खाडेकर


🌟जागतिक महिला दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलतांना त्यांनी केले प्रतिपादन🌟

पूर्णा,ता .११(बातमीदार )   

आधुनिक काळानुसार महिलांनी स्वतःला विविध लघु उद्योग व शेतीला जोड व्यवसाय करण्यासाठी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुन मदत केली तर आर्थिकदृष्ट्या कुटुंब सक्षम होईल असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी आधिकारी श्रीमती रस्मीताई खाडेकर यांनी केले.


      येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय येथे रिलायन्स फाऊंडेशन व उमेद अभियान परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री पुरुष समानतेसाठी आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानचा प्रसार व्हावा म्हणून (ता.१०) शुक्रवार  रोजी महिला दीनानिमित्त अन्नधान्यापासुन विविध पदार्थ बनवून लावलेल्या स्टालला प्राधान्य देण्यात आले व महीला दिनानिमित्त कतृत्ववान महीलांचा सत्कार करण्यात आला . 

       कार्यक्रमासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रस्मीताई खाडेकर ,जिल्हा आभियान समन्वयक दीपक दहे,कृषी विज्ञान केंद्र परभणी डॉ प्रशांत भोसले ,राष्ट्रीयकृत बंकेचे  सर व्यवस्थापक  सुनिल हट्टेकर,अजन्टा फॉर्मर प्रोडूसर कंपनी गंगाखेड चे अध्यक्ष रोहीदास निरश,प्रगतशील  महीला शेतकरी मिरा आवरगंड जनार्धन आवरगंड , पंडीत थोरात यांची उपस्थिती होती महीला दिनानिमित्ताने परभणी जिल्ह्यामधील महिला बचत गट यांनी विविध प्रकारचे स्टॉल लावलेत त्यामधे लाकडी तेल घाना तेल, वाळुक उसरी,विवीध जात्यावरील, दाळी,घरी बनवलेले झाडपाल्या पासून प्रोजेक्ट गोकृपा आब्रुत,दसपर्णी अर्क,बॉयोगॉस सलरी, पापड कुरडया, सेंद्रिय डाळी, गूळ, शहद, हातकाम 

विणलेले झुंबर मशरूम कटलरी इत्यादी विक्री करण्यात आली. महिलांचे जिवनमान उचावने आणि उपजीविका विकास होण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशन आणि उमेद अभियान सतत कार्यतत्पर असतात. सदर कार्यक्रम मध्ये 60 बचत गटांना कर्ज मंजूर करून चेक वाटप सुद्धा करण्यात आले.

रिलायन्स च्या महीला जिल्हा आघ्यक्ष रुपा.भादक्कर .भालेराव परभणी सर अश्विनी पाटील सोबत उत्कृष्ठ बचत रावसाहेब परमार.अक्षय डागे.अमन परमार.गटांना व वैयक्तिक महिलाना पारितोषक देण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक दहे यांनी केले सूत्रसंचालन व आभार अमोल खंडागळे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रिलायन्स फाउंडेशनच्या सर्व कर्मचारी व उमेद चे सर्व कर्मचारी आदी नी पुढाकार घेतला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या