🌟वऱ्हाडी जत्रेत हवेत तरंगणारे अधांतरी बाबा ठरले मुख्य आकर्षण : बुवाबाजीचा चित्तथरारक चमत्कार


🌟सादरीकरणातला महिला बचत गटासह उपस्थित मंडळी सह अधिकारी/कर्मचाऱ्यांसह पदाधिकारी देखील प्रभावित🌟


🌟चमत्काराला बळी न पडण्याचे अंनिसचे आवाहन🌟

फुलचंद भगत

मंगरुळपीर:-जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद वाशिम च्या वतीने अमरावती विभागाच्या पाचही जिल्ह्यातील बचत गटाच्या महिला मंडळीनी उत्पादित केलेल्या विविध वस्तू व खाद्यपदार्थ तसेच जीवनावश्यक वस्तू चे प्रदर्शन व विक्री आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल व वैचारिक मेजवानीचा तिन दिवस वाशिमकरांनी आस्वाद घेतला. 


रविवारी दुपारी चार वाजता चमत्कार व त्या मागील विज्ञान हा आगळा वेगळा कार्यक्रम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे जिल्हा कार्याध्यक्ष पी. एस. खंदारे यांनी सादर केला. केवळ काठीच्या आधारावर  हवेत तरंगणारे अधांतरी बाबा या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले, जिल्हा परिषद चे अधिकारी यांच्या हस्ते पाण्याच्या दिवा पेटवून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारे उद्घाटन झाले तर बुवाबाजीच्या उदाहरणासह विविध प्रकारचे चमत्कार सादरीकरण करून बुवाबाजीला बळी न पडण्याचे आवाहन पी एस खंदारे यांनी गाडगे बाबांच्या वेशभूषा करून समाज प्रबोधन केले. हवेत तरंगणारे अधांतरी बाबाच्या भुमिकेत दलित मित्र बबनराव मोरे हिंगोली हे होते,बुवाबाजी विभाग प्रमुख तथा अशासकीय सदश्य जादूटोणा विरोधी कायदा प्रचार आणि प्रसार अमलबजावणी समिती वाशिम चे दतराव वानखेडे, महिला विभाग प्रमुख तथा अशासकीय सदश्य जादूटोणा विरोधी कायदा प्रचार आणि प्रसार अमलबजावणी समिती वाशिम चे कुसुमाताई सोनुने, दिलीप वानखेडे कोयाळी यांचा सहभाग लाभला. या सत्राराचे सुत्रसंचालन राजु सरतापे यांनी केले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या