🌟नांदेड जिल्ह्यातील एकाकाळचे सुप्रसिद्ध क्रिडापटु अवतारसिंघ रामगडिया यांचे दुःखद निधन....!


🌟त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,नातू आणि दोन भाऊ असा मोठा परिवार आहे🌟

नांदेड (दि.20 मार्च) : नांदेड जिल्ह्यातील एकाकाळचे उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू आणि एनआयएस कोच स. अवतारसिंघ रामगडिया यांचे ता. 20 मार्च, सोमवार रोजी सकाळी निधन झाले. शेवटच्या क्षणी त्यांचे वय अंदाजे 72 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, नातू आणि दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. तसेच त्यांचे क्रीडा क्षेत्रातील विविध संघटना आणि खेळाडूशी त्यांचे घनिष्ठ संबंध कायम होते. 

स. अवतारसिंघ रामगडिया हे मल्टीपर्पज हायस्कूल वजीराबाद येथील ते रहिवाशी होते आणि नेहमीच क्रीडा क्षेत्रास प्रोत्साहन करण्यात ते अग्रेसर असायचे. क्रिकेट, हॉकी, वेटलिफ्टिंग, कुस्ती सारख्या असंख्य खेळात त्यांनी खेळाडू घडवलेलें आहेत. नांदेड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे ते पदाधिकारी होत. त्यांच्या निधनामुळे क्रीडा क्षेत्राची मोठी क्षति झाली म्हंटल्यास वावगं होणार नाही.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या