🌟पुर्णेतील श्री दत्त मंदिर परिसरात प्रचंड घाणीचे साम्राज्य : श्री गुरुचरित्र पारायन सप्ताहा दरम्यानही स्वच्छता नाही..!


🌟स्वच्छते संदर्भात विचारणा करण्यास गेलेल्या नगरसेवक प्रतिनिधींना स्वच्छता निरिक्षकांची चक्क उडवा उडवीची उत्तर🌟


पुर्णा (दि.०२ फेब्रुवारी) -  शहरातील श्री दत्तमंदिर देवस्थान परिसरात दि.२२ फेब्रुवारी ते ०१ मार्च २०२३ रोजी श्री.दत्त मंदिर देवस्थान समितीच्या वतीने श्री गुरुचरित्र पारायन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहा निमित्त श्री.गुरुचरित्र पारायन सोहळ्याचे पावित्र्य अबाधित राहावे व दत्त मंदिर परिसर स्वच्छ व्हावा या उद्देशाने दत्त मंदिर देवस्थान समितीच्या विनंती वरून या प्रभागातल्या सन्माननीय नगर सेविका कदम यांचे सुपुत्र तथा प्रतिनिधी नितीन उर्फ बंटी कदम यांनी नगर परिषद स्वच्छता विभागाचे निरिक्षक नईम खान छोटे खान पठाण व कंत्राटी कर्मचारी महेष रापतवार यांच्याशी संपर्क साधून त्यांना परिसरात मोठ्या प्रमाणात साचलेली कचऱ्यांची ढिगार उचलून नाल्यांची देखील तात्काळ साफसफाई करण्यास सांगितले परंतु त्यांनी सांगितल्या नंतर देखील संपूर्ण परिसर व नाल्यांची स्वच्छता करण्यास चालढकल करण्यात आली त्यामुळे जागोजाग तुंबलेल्या नाल्यांतील गलिच्छ पाणी रस्त्यावर आल्यामुळे या धार्मिक कार्यक्रमात सहभाग नोदवणाऱ्या भाविकभक्त मंडळींना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.


दरम्यान नगर सेवक प्रतिनाधी तथा मा.शहराध्यक्ष नितीन कदम यांनी कार्यालयीन अधिक्षक बाबर खान अब्दुल हमीद खान यांच्याशी संपर्क साधून त्यांना परिसराची पाहणी करण्यास सांगितले यावेळी सदरील परिसरातील अस्वच्छतेचा आखो देखा हाल त्यांना निदर्शनास आल्यामुळे त्यांनी या गंभीर घटने संदर्भात दि.०१ मार्च २०२३ रोजी मुख्याधिकारी नगर परिषद पुर्णा यांना स्वच्छता निरिक्षक नईम खान छोटे खान,कंत्राटी कर्मचारी रापतवार व स्वच्छता टेंडर मध्ये नाल्यांची स्वच्छता करणे बंधनकारक नसल्याचे सांगणारे स्वच्छता कंत्राटदार यांच्या विरोधात सविस्तर रिपोर्ट सादर केला असून या प्रकरणाची दखल घेऊन संबंधिता विरोधात मुख्याधिकारी काय कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


🌟पुर्णा न.पा.स्वच्छता विभागातील बेजवाबदार स्वच्छता निरिक्षकांसह स्वच्छता कंत्राटदारावर कारवाई करा - नितीन कदम


पुर्णा नगर परिषद प्रशासनाने शहरातील स्वच्छतेचे टेंडर दिलेले बेजवाबदार कंत्राटदार जि.एम.कन्स्ट्रक्शन यांच्या विरोधात आज गुरुवार दि.०२ मार्च २०२३ रोजी नगरसेवक प्रतिनिधी तथा शिवसेना माजी शहरप्रमुख नितीन उर्फ बंटी कदम यांनी नगर परिषद मुख्याधिकारी कदम यांनी लेखी स्वरुपात निवेदन देऊन संबंधित कंत्राटदार यांना शहरातील स्वच्छते संदर्भात केव्हापासून काम देण्यात आले त्यांच्याकडे कामावर एकून कामगार किती कचरा वाहतूक करण्यासाठी घंटागाड्या किती व शहरातील कोणत्या भागात काम करतात व संबंधित कंत्राटदाराला आतापर्यंत किती बिल अदा करण्यात आले या संदर्भात माहिती मागीतली असून यापुढे संबंधित बेजवाबदार कंत्राटदारास कुठल्याही प्रकारचे बिल अदा करु नए अशी मागणी देखील करण्यात आली असून या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी परभणी,जिल्हा नगर परिषद प्रशासनाला देखील पाठवण्यात आल्या आहेत....... 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या