🌟पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानक क्रमांक चारच्या मुख्य दर्शनी प्रवेश द्वारावरील छताचा प्लास्टर अचानक कोसळले....!


🌟दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाकडून निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या गुत्तेदारांना कामे देण्याचा परिणाम : सुदैवाने हाणी नाही🌟


पुर्णा (दि.२९ मार्च) - दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाकडून भ्रष्ट गुत्तेदारांना रेल्वे स्थानकांसह रेल्वे परिसरातील कामे देण्यात येत असल्यामुळे अल्पकालावधीतच ही निकृष्ट बांधकाम रेल्वे प्रशासनासह भ्रष्ट गुत्तेदारांचा भ्रष्ट कारभार प्रत्यक्ष उघड करीत असल्याचा गंभीर प्रकार आज बुधवार दि.२९ मार्च २०२३ रोजी दुपारी अंदाजे ०१-०० वाजेच्या सुमारास पाहावयास मिळाला.


पुर्णा रेल्वे स्थानक क्रमांक चार वरील नवीन बांधकाम असलेल्या मुख्य दर्शनी प्रवेश द्वारावरील निकृष्ट दर्जाच्या छताचे प्लास्टरचा काही भाग दुपारी ०१-०० वाजेच्या सुमारास अजानक खाली पडायला सुरुवात झाला यावेळी प्रवासी वर्गासह अबालवृध्द व त्यांची मुल या ठिकाणी थांबलेली होती परंतु ते तात्काळ बाजुला पळाल्यामुळे सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही परंतु रेल्वे प्रशासनासह भ्रष्ट गुत्तेदारीचे पित्तळ मात्र या घटनेमुळे उघड झाले.....

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या