🌟परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यातील उखळी शिवारात वीज पडून २ जन जागीच ठार तर ३ जन जख....!


🌟तालुक्यात सर्वत्र अवकाळी पावसाचा हाहाकार : शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान महसुल प्रशासन मात्र संपात मग्न🌟


परभणी (दि.१७ मार्च) - परभणी जिल्ह्यात सर्वत्र विजेच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या अवकाळी पावसासह गारपीटीने हाहाकार माजवला असुन जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातल्या उखळी खुर्द परीसरात झालेल्या अवकाळी पावसात विज पडून बालासाहेब बाबुराव फड वय वर्षे ५० व जयवंत नागरगोजे वय वर्षे ३५ हे दोघे जण जागीच ठार झाल्याची तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आसून घटनास्थळी पोलिस पथकाना तात्काळ धाव घेतली परंतु तहसिलदार/नायब तहसिलदार व महसुल प्रशासनातील अधिकारी/कर्मचारी फिरकलेच नाही.


गंगाखेड तालुक्यात गुरूवार मध्यराञी पासूनच विजेच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची सुरूवात झाली आज शुक्रवार रोजी सकाळ पासूनच ढगाळ वातावरण होते दुपारचा सुमारास विजेचा गडगडाट सुरू झाला यातच पावसाला सुरूवात झाली तालुक्यातील उखळी खुर्द परिसरात विजेचा गडगडाट व पाऊस आल्याने शेतकरी बालासाहेब फड व सालगडी हे शेतातील बाबळीचा झाडाखाली थांबले आसता क्षणातच विजेचा कडकडाट होऊन वीज बाबळीवर पडल्याने या दोघाचा जागेवरच मृत्यू झाला तर झाडाचे दोन तुकडे झाले.तर बाबळीचा झाडा पासून जवळ थांबलेल्या राहिबाई बाबुरावफड वय 70राजेभाऊ किसन नरवाडे वय 40 सतीश सखाराम नरवाडे वय 35  हे तीघे जण भाजले गेले त्यांना तातडीने गंगाखेड उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.यात राहिबाई फड हिचावर उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी येथे हालविण्यात आले आहे.उखळी खुर्द येथे वीज पडल्याची घटना कळताच पोलिस निरिक्षक वसुधंरा बोरगावकर यांनी धाव घेत पंचनामा केला पण महसुलचे तहसिलदार नायब तहसिलदार फिरकलेच नाही....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या