🌟पुर्णेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ.शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त शिवसेना ठाकरे गटाकडून अभिवादन..!


🌟शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन केले अभिवादन🌟


पूर्णा ( १० मार्च  ) - महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या (तिथीनुसार) जयंती निमित्त आज शुक्रवार दि.१० मार्च २०२३ रोजि शिवसेना (उध्दव ठाकरे) गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम,शिवसेना मा.जिल्हाप्रमुख तथा गंगाखेड विधानसभा सहसंपर्क प्रमुख सुधाकर खराटे व पुर्णा पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

यावेळी शिवसेना शहर प्रमुख संकेत उर्फ मुंजाभाऊ कदम नगरसेवक ॲड.हर्षवर्धन गायकवाड,पत्रकार चौधरी दिनेश, सामाजिक कार्यकर्ते रवी गायकवाड, प्रवीण गायकवाड,पत्रकार दिपक वावळे आदी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या