🌟पुर्णा तालुक्यात छत्रपती संभाजी महाराज सेनेतर्फे शिवजयंती निमित्त विशेष सामान्य ज्ञान परीक्षा संपन्न....!


 🌟त्यामध्ये छत्रपती शिवाजीराजे भोसले,राजमाता जिजाऊ धर्मवीर संभाजी राजे यांच्या जीवन चरित्रावर परिक्षा घेण्यात आली🌟

पुर्णा तालुका संभाजी सेनेच्या वतीने दि.१३ मार्च २०२३ रोजी सामान्य ज्ञान परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये छत्रपती शिवाजीराजे भोसले,राजमाता जिजाऊ धर्मवीर संभाजी राजे यांच्या जीवन चरित्रावर तीस प्रश्न पत्रिका असलेले तीस मार्क पेपर आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुकटगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कानेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माखणी या तीन शाळेमध्ये सामान्य ज्ञान व आपल्या राजा विषयी माहिती विद्यार्थ्यांना कितपत आहे याचा उद्देश ठेवून या परीक्षा घेण्यात आल्या या परीक्षांचे नियोजन संभाजी सेना प्रदेशाध्यक्ष रामेश्वर . शिंदे तर परभणी जिल्हा अध्यक्ष विठ्ठल . तळेकर यांनी केले तर अरुण. पवार .परभणी शहराध्यक्ष व सुधाकर  सोळंके. ग्रामीण जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा  घेण्यात आली गोविंद मोरे संभाजी सेना तालुका अध्यक्ष पूर्णा यांनी या तीन गावांमध्ये आपले संघटनेतील पदाधिकारी घेऊन  छत्रपती शिवाजी राजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान परीक्षेचे वेळापत्रक व प्रश्नपत्रिका त्यांच्याकडे देऊन परीक्षेचे नियोजन केले यामध्ये प्रश्नपत्रिका बनवण्याचे किंवा आपल्या राज्यांविषयी राजमातेविषयी प्रश्न निवडण्याचे काम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुकटगाव येथील शिक्षक बबनराव पारवे सर  व मुख्याध्यापक गोविंद नलबलवार  यांनी आम्हास प्रश्नपत्रिका काढून देण्यासह सहकार्य केले व तीनही गावातील परीक्षांचे नियोजन वेळापत्रक हे अबनराव पारवे  सहशिक्षक फुकटगाव यांनी योग्य मार्गदर्शन करून ठीक अकरा ते बारा या वेळेत पेपर घेण्याचे नियोजन करून दिले. 

तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कानेगाव येथील मुख्याध्यापक टी के बिराजदार . यांनीही आपल्या सहशिक्षकांसोबत आम्हाला मुलाचे मार्गदर्शन करून परीक्षा योग्य रीतीने पार पाडण्याचे कार्य केले तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माखणी येथील मुख्याध्यापक जोशी . यांचेही आम्हाला खूप मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले व त्यांच्या   व सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन व छोट्या खाणी कार्यक्रम तसेच त्यामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या विषयी विचार प्रगट केले व सहशिक्षक टीम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माखणी यांनीही खूप आपले विचार मांडले  सावित्रीबाई फुले यांच्या विषयी मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले त्या ठिकाणी उपस्थित शिक्षण समितीचे अध्यक्ष शिवाजीराव आवरगंड व आमचे पत्रकार बंधू व प्रगतशील शेतकरी जनार्धन आवरगंड व कार्यक्रमाचे  अध्यक्ष म्हणून गोविंद पांडुरंग मोरे संभाजी सेना तालुका अध्यक्ष पूर्णा यांनी अध्यक्ष स्थानी होते.व विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले व विद्यार्थी व विद्यार्थिनींना असे संबोधित केले की आपल्या गावामध्ये किंवा आपल्या शाळेमध्ये सर्व शिक्षक वृंद हे ज्ञानगंगा घेऊन आले आहेत  आणि या ज्ञानगंगेचा अमृत हे सर्व विद्यार्थ्यांनी प्राशन करावं खूप अभ्यास कराव आणि त्यांनी आपलं नाव अपले गावाचे नाव लवकिक करावं खूप शिकावं मोठं व्हावं व आपल्या गुरुजनांचाही नाव आई-वडिलांचे नाव लौकिक करावं असे सांगून या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थानी बोलत होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक संजय जोशी राजकुमार ढगे सुरज पौळ.सुनील शेळके राम महाजन गजानन पवार जोत्ती झटे.गावकरी मंडळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  पवार .यांनी केले तर प्रस्थावीक  जोशी यांनी केले तर आभार.ढगे.यांनी केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या