🌟परभणी येथून हजारो शिवसैनिक छत्रपती संभाजीनगरच्या सभेला जाणार - आमदार डॉ.राहूल पाटील


 🌟परभणीत मा.खासदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत केली घोषणा🌟

परभणी (दि.29 मार्च) - छत्रपती संभाजीनगर येथे रविवार, दि.०२ एप्रिल २०२३ रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणाऱ्या वज्रमुठ महाविकास आघाडीची या  जाहीर सभेस संबोधीत करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. तसेच या सभेस विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या जाहीर सभेस परभणीतून हजारो शिवसैनिक जाणार आहेत अशी माहिती परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राहुल पाटील यांनी दिली.

याबाबत आमदार डॉ.पाटील यांच्या संपर्क कार्यालयामध्ये छ.संभाजीनगरचे माजी खासदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत परभणी विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी बोलताना आमदार डॉ.पाटील म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे राज्यातील विविध विभागात वज्रमुठ महाविकास आघाडीची जाहीर सभा घेत आहेत. महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची प्रथमच छत्रपती संभाजी नगर येथे विराट जाहीर सभा होत आहे. छ.संभाजीनगर येथे होणारी ही सभा मराठवाड्यातील शिवसैनिकांसाठी महत्त्वाची असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या विराट जाहीर सभेस उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या सभेसाठी जिल्ह्यातून शिवसेनेचे हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची ग्वाही शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना आ.डॉ.पाटील यांनी दिली. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख नंदकुमार आवचार, माजी शहर प्रमुख अनिल डहाळे, अरविंद काका देशमुख, शहर प्रमुख ज्ञानेश्वर पवार, प्रशास ठाकूर, नवनीत पाचपोर, युवासेना तालुका प्रमुख संदीप झाडे, मारोती तिथे,शहर प्रमुख विशू डहाळे, बाळराजे तळेकर, प्रताप पवार, रामा कदम, दामोधर सानप, सोपानराव आरमाळ, गौरव तपके आदीसह शिवसेना, युवासेना पदाधिकारी उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या