🌟महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या विदर्भ अध्यक्षपदी निलेश सोमाणी....!


🌟राज्य कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला🌟

फुलचंद भगत

वाशिम : सामाजिक कार्यात अग्रसेर असलेल्या तरूण क्रांती मंच व भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश पुनमचंदजी सोमाणी यांची महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी काम करणार्‍या सर्वात मोठे संघटन असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुुंबईच्या विदर्भ अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.  

     10 मार्च 2023 रोजी शिर्डी येथे पार पडलेल्या संघटनेच्या राज्यस्तरीय पदाधिकारी अधिवेशनात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंढे, प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, प्रदेश संघटक संजय भोकरे, प्रदेश प्रसिध्दी प्रमुख नवनाथ जाधव, राज्य कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देवून सत्कार करण्यात आला. सोबतच सदर अधिवेशनात पत्रकारिता क्षेत्रात काम करीत असतांना सामाजिक बांधीलकीची जाण ठेवून विविध सामाजिक उपक्रम राबवून पत्रकार संघाला नावलौकीकता प्राप्त करून दिल्याबद्दल विशेष सन्मानपत्र पुरस्काराने राज्याध्यक्ष वसंतराव मुंढे यांच्याहस्ते सन्मानपत्र,बुके देवून सन्मानित करण्यात आले. निलेश सोमाणी यांनी यापूवी सर्वप्रथम वाशिम जिल्हाध्यक्ष म्हणून संघटनेमध्ये काम सुरू केले. त्यानंतर त्यांच्रूा कार्याची दखल घेवून त्यांना अमरावती विभाग अध्यक्षपदाची जवाबदारी देण्यात आली होती. जिल्हा व विभागात पातळीवर केलेल्या कार्याची दखल घेवून त्यांची विदर्भ अध्यक्षपदावर संघटनेने मोठी जवाबदारी देवून अकरा जिल्हयामध्ये संघटनेचे काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. सदर संधीचे आपण निश्चितपणे सोने करून विदर्भात पत्रकारांच्या हितासोबतच सामाजिक क्षेत्रात भरिव काम करून संघटनेनने दाखविलेल्या विश्वासाला सार्थ करू असे प्रतिपादन केले आहे. सदर निवडीबद्दल राज्यकार्यकारिणी सदस्य बाळासाहेब देशमुख, नवनिर्वाचीत जिल्हाध्यक्ष निनाद देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, पंकज गडेकर, संजीव भांदुर्गे, प्रमोद खडसे, संजय खडसे, संदीप डोंगरे, आदिंनी अभिनंदन करून स्वागत केले आहे.  विदर्भात लवकरच सर्व जिल्हयात दौरा करून संघटनेची नव्यानी बांधणी करण्यात येणार असून पत्रकारितेमध्ये कार्य करू इच्छिणार्‍या समाजसेवकांनी संघटनेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन नवनिर्वाचीत विदर्भ अध्यक्ष निलेश सोमाणी यांनी केले आहे. 

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशीम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या