🌟पुर्णेचे नुतन तहसिलदार बोथीकर अवैध रेती तस्करी विरोधात कारवाई करण्यास सज्ज ?


🌟तालुक्यातील माटेगाव/कौडगाव शिवारात कारवाई ? दोन तराफे जाळून रेती तस्करांना दिला सावधानतेचा इशारा🌟

पुर्णा (दि.१८ मार्च) - पुर्णा तालुक्यातून वाहणाऱ्या पुर्णा-गोदावरी नदीपात्रांवर अक्षरशः गिधाडांनी मृत जनावररांच्या देहाचे लचके तोडल्यागत तुटून पडलेल्या अवैध रेती तस्करांना पुर्णा तहसिलचे नुतन तहसिलदार माधवराव बोथीकर यांनी सावधानतेचा इशारा देत माटेगाव- कौडगाव शिवारातील पुर्णा नदीपात्रापात्रावर धडक देऊन नदीकाठावरील अवैध रेती उत्खननासाठी रेती तस्करांकडून रेती वापरल्या जाणारे तराफे ताब्यात घेऊन त्यांचे दहन करण्याची कारवाई दि.१५ मार्च २०२३ रोजी दुपारी ०४-०० ते ०४-३० वाजेच्या सुमारास केली यावेळी त्यांच्या सोबत उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील,नायब तहसिलदार नितेशकुमार बोलेलू,तलाठी अरविंद लक्ष्मण डांगे,ग्रामसेवक ग्रामसेवक राम उत्तमराव घोडके आदींची उपस्थिती होती.

पुर्णा-गोदावरी नदीपात्रांतून मोठमोठया तराफ्यांच्या साहाय्याने तर काही भागात जेसीबी यंत्रांच्या साहाय्याने शासकीय गौण-खनिज रेतीचे प्रचंड प्रमाणात उत्खनन करून या चोरट्या रेतीची असंख्य वाहनांतून चोरटी वाहतूक होत असतांना संबंधित क्षेत्रातील ग्रामसेवक/तलाठी/मंडळ अधिकारी आपल्या कर्तव्याशी दगलबाजी करीत या सर्व गंभीर प्रकाराकडे डोळेझाक करीत असल्यामुळे नुतन तहसिलदार बोथीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या क्षेत्रात यापुढे अवैध गौण-खनिज रेती/मुरुम/दगड खडी/मातीचे उत्खनन होत असल्यास किंवा चोरट्या रेतीची वाहतुक होतांना आढळून आल्यास त्या क्षेत्रातील मंडळ अधिकारी/तलाठी/ग्रामसेवक यांना जबाबदार धरून त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जारी काल्यास शासकी गौण-खनिजाची होणारी लुटमार निश्चितच थांबेल यात शंका नाही....... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या