🌟परभणी येथील वसमत रोडवर हरभरा खरेदी केंद्र सुरु....!


🌟परभणी विधानसभेचे आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या आंदोलनाला यश🌟


परभणी (दि.२३ मार्च) - नाफेड व महाराष्ट्र एफपीसी संचलित हरभरा हमीभाव खरेदी केंद्राचे उदघाटन खासदार संजय जाधव व आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले जिल्ह्यात हरभरा खरेदी केंद्र सुरु करावेत यासाठी परभणी विधानसभेचे आमदार डॉ.राहुल पाटील यांनी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन केले होते त्या आंदोलनाची दखल घेत शासनाकडून परभणी जिल्ह्यात ०८ हरभरा हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहेत.

राज्यात रब्बी हंगामात हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन वाढले आहे.शेतकऱ्यांचे अर्थकारण रब्बी हंगामावर अवलंबुन असते.मराठवाड्यात हरभरा हे प्रमुख पिक आहे.मागील एक महिण्यापासून हरभरा पिकाची काढणी सुरु आहे.जवळपास काढणी आटोक्यात आली आहे.परंतु अद्याप शासकीय खरेदी केंद्र सुरु झाले नसल्याने शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांना कवडीमोल दराने विक्री करावे लागत आहे.खरेदी केंद्र सुरु करा अशी मागणी परभणीचे आमदार डॉ.राहुल पाटील यांनी केली होती या मागणीसाठी बुधवार (दि.आठ)मार्च रोजी विधानसभेच्या अर्थसकंल्पयीय अधिवेशनादरम्याण विधानभवनाच्या पायऱ्यावर बसुन आंदोलन केले होते.या आंदोलनाची दखल घेत सरकारने जिल्ह्यात आठ ठिकाणी खरेदी केंद्रास मंजुरी दिली होती.त्यातील काही खरेदी केंद्र प्रत्यक्षात सुरु झाले.वसमत रोडवरील खरेदी केंद्राचा शुभारंभ मंगळवारी (दि.२२) करण्यात आला.यावेळी  खासदार संजय जाधव,आमदार डॉ.राहुल पाटील,शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, भगवानराव धस, रमेशराव धस, नारायण धस, माणिक भालेराव, रवी खुळे, पांडुरंग खुळे, राजु खुळे, विठ्ठल धस,अशोक गव्हाणे, गोविंद धस, आप्पाराव धस, लक्ष्मण भालेराव, हनुमान भालेराव, व पंचक्रोशीतील हरभरा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामकिसन धस यांनी केले व आभार प्रदर्शन करताना संचालक नारायण धस यांनी आमदार साहेबांच्या प्रयत्नामुळे नाफेड केंद्र सुरवातीस मान्यता मिळाल्यामुळे आमदार साहेबांचे सर्व पंचक्रोशीतील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानले..,,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या