🌟पुर्णा येथील चालक मालक संघटने कडून अपघातात मृत्यू झालेल्या भिमाशंकर कदम कुटुंबास मदतीचा हात....!


🌟चालक आणि मालक संघटनेने समाजापुढे एक आदर्श निर्माण केला🌟 

पुर्णा (दि.२६ मार्च) - वसमत तालुक्यातील आडगाव (रंजेबूवा) येथे झालेल्या दुर्दैवी भिषण अपघातात आपला जीव गमावावा लागलेल्या चालक भीमाशंकर कदम राहणार देगाव तालुका पूर्णा यांच्या दोन मुलींच्या नावाने सुकन्या समृध्दी योजनेत प्रतेकी ५५,०००/- रुपये जमा करून चालक आणि मालक संघटनेने समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.


दरम्यान चालक भीमाशंकर कदम यांचे आडगाव ता वसमत येथे झालेल्या दुर्दैवी अपघातात जागीच निधन झाले, यानंतर त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलींच्या भविष्यासाठी काहीतरी करावे असा विचार चालक मालक संघटनेने एका बैठकीत मांडण्यात आला, त्यावर सर्व सदस्यांनी वर्गणी करून प्रेतेकाने आपापल्या परीने प्रयत्न करीत सुमारे ५५,०००/- रुपये कु. सिध्दी भीमाशंकर कदम आणि ५५,०००/- रुपये कु.रिद्धी भीमाशंकर कदम यांच्या नावाने पोस्ट ऑफिस मध्ये सुकन्या समृध्दी योजनेत गुंतवणूक करण्यास आली आहे, सदर मानवतावादी कार्यामुळे पूर्णेच्या चालक मालक संघटनेचे परिसरातून कौतुक होते आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या