🌟पाडवा जवळ येताच शेतकरी बांधवांची सालगडी ठेवण्यासाठी धावपळ....!


🌟शेतकरी बांधवांना सालगडी ठेवण्यासाठी वर्षाला द्यावा लागतो लाख रुपये मोबदला🌟

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर तालुक्यातील शेतीची कामे करण्यासाठी सालगड्यांची महत्त्वाची भूमिका असते दरवर्षी पाडव्यांच्या मुहूर्तावर शेतकरी सालगड्याची नेमणूक करतो. पाडवा अवघ्या काही दिवसांवर असून सालगड्यांची दरही कडाडलेले दिसून येतात. त्यामुळे अनेक शेतकरी परगावाहून आलेल्या सालगड्यांसी करार करीत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येत आहे.


तालुक्यात सध्या शेती व शेतीपूरक रोजगार व्यवसाय असल्यामुळे त्यात महत्त्वाचा घटक म्हणजे शेतकरी शेतीची विविध कामे करण्यासाठी एकट्या शेतकऱ्याला शक्य नसल्याने सालगड्याची संकल्पना पुढे आली व अनेक वर्षापासून शेती कामात सालगड्यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. दरवर्षी शेतकऱ्यांकडून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सलगड्याची नेमणूक केली जाते. या बदल्यात सालगड्याला शेतकरी वर्षाकाठी काही रोख रक्कम व धान्य स्वरूपात तीन ते चार क्विंटल धान्य देतात. ही पद्धत आजही कायम आहे. मात्र वाढती महागाई आणि काळानुसार सालगड्यांच्या दरात वाढ झाली आज ती एक 10,2000 हजार पर्यंत पोहोचलेली असल्याने शेतकऱ्यांना मात्र सालगडाची शोधाशोध करावी लागत असल्याचे चित्र जिंतूर तालुक्यातील  शहरासह ग्रामीण भागातही दिसून येत आहे.

* संकटावर मात करणारा शेतकरी :-

कितीही संकटे आली तरी शेतकरी आपले काम चालूच ठेवतो गतवर्षींच्या नुकसानीची कात झटकून पुन्हा शेतकऱ्याला कामाला लागलेला दिसून येतो.यंदा पाडवा काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शेतकऱ्याची सालगड्यासाठी लगबग सुरू असल्याचे चित्र शहरासह ग्रामीण भागात दिसून येते.

* सध्या यांत्रिकीकरण असून देखील सालगड्याला महत्त्व आहे :-

तालुक्यातील बहुतांश शेतकरीयांत्रीकी शेतीकडे वळलेले असले तरी शेती कामासाठी सालगडी किती महत्त्वाचा आहे हे चित्र पाहावयास मिळते. बहुतांश शेतकरी एकापेक्षा अधिक सालगड्याची नेमणूक करतात यंदा सालगड्याचे दर  कडाडले असून इटोली परिसरात  एक लाख दहा हजार रुपये व तीन ते चार क्विंटल धान्य तर काही ठिकाणी एक लाख वीस हजारापर्यंत व तीन ते चार क्विंटल धान्य असा भाव पोहोचलेला दिसून येतो त्याशिवाय धान्यही महत्त्वाचे.

*शेतकऱ्यांनी शेती करावी कशी :-

जिंतूर तालुक्यातील बहुतांश शेतकरी हा निसर्गावर अवलंबून  असून गतवर्षी बी बियाणे, खते, औषधी, मजुरी आदी सह वाहतुकीच्या दरात वाढ झाली आहे शिवाय मळणी, खुरपणी, कापणीचे दरही वाढले दिवसेंदिवस वाढती महागाईचा सामान्य नागरिकांना फटका बसत असला तरी त्यात सर्वाधिक फटका हा शेतकरी वर्गाला सहन करावा लागतो आता नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सालगड्यांचा शोधा शोध सुरू आहे मात्र त्यांनाही कामाचे दर वाढल्याने शेती करावी तर कशी अशी भावना ही काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या