🌟पत्रकारांच्या मजबूत एकात्मतेसाठी स्थानिक पातळीवर आवश्यकता जनहीतवादी प्रेस क्लबची...!


🌟जनहीतवादी निर्भिड पत्रकारांनी आपआपसातील मतभेद विसरुन एकत्रित येण्याची आवश्यकता🌟 

पत्रकार मित्रांनों...✍🏻

 राष्ट्रीय/राज्य तसेच जिल्हा पातळीवर कोणत्याही पत्रकार संघटनांचे सदस्य किंवा पदाधिकारी म्हणून जरी कार्यरत असाल तरी स्थानिक पातळीवर मात्र आपआपसातील मतभेद विसरुन 'जनहीतवादी तालुका प्रेस क्लब' च्या नावावर पत्रकारांनी एकत्रित येवून स्थानिक प्रशासकीय राजकीय/सामाजिक क्षेत्रावर एक मजबूत असा पत्रकारांचा दबाब गट निर्माण करणे ही काळाजी गरज आहे.

🌟मतभेद नक्कीच असावे परंतु मनु प्रमाणे मनभेद निर्माण करणारी दृष्ट मनुवादी प्रवृत्ती अंगी नसावी :-

स्थानिक पातळीवर पत्रकारांतील असंघटीतता व हेवेदावे तसेच मतभेद निर्भिड जनहीतवादी पत्रकारांच्या अवमानाला सातत्याने  कारणीभूत ठरत असून पत्रकारांतील मतभेदांचा आणि गटबाजीचा भ्रष्ट अधिकारी/तत्वभ्रष्ट राजकारणी अन् अनैतिक व्यवहारांना प्राधान्य देत प्रत्येक अवैध व्यवसांना आपल्या कमाईचे साधन बनवणारे समाज घातकी सातत्याने गैरफायदा घेऊन काही झारीतील शुक्राचार्य प्रवृत्तीच्या ताटाखालील मांजरांना हाताशी धरुन स्वतःची वाहवांह करुन तर घेतच आहेत याशिवाय आपल्या गैरकृत्यांवर सोईस्कररित्या पांघरून घालून अकार्यक्षमतेचा कळस गाठत जनहीतांशी दगलबाजी करण्याचे घोर पाप करीत असल्याचे निदर्शनास येत असल्यामुळे याचा गंभीर परिणाम सर्वसामान्यांवर होत असतो त्यामुळे जनहीतवादी पत्रकारांमध्ये आपआपसात टोकाचे मतभेद जरुर असावे परंतु दृष्ट मनु प्रमाणे मनभेद निर्माण करणारी मनुवादी प्रवृत्ती अंगी निश्चितच नसायला हवी.

🌟पत्रकारांतील आपसी द्वेषभावना जनसामान्यांसह दस्तुरखुद्द पत्रकारांसाठी घातक : भ्रष्ट बेईमानांसाठी मात्र संधीसाधक :-

राज्यासह राज्यातील प्रत्येक जिल्हा/तालुका पातळीवर पत्रकारांच्या विविध संघटना कार्यरत आहेत ज्या आपआपल्या परीने पत्रकारांच्या हितासाठी कार्य करीत असल्याचे निदर्शनास येत असून यात सन्माननीय एस.एम.देशमुख सर व सन्माननीय किरण नाईक सर यांच्या नेतृत्वाखालील अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना,नागपूर येथील संघपाल गडलींग सर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघ तर संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी स्थापण केलेली व्हाईस ऑफ मिडिया या पत्रकार संघटनांसह अन्य पत्रकार संघटना देखील राज्यासह प्रत्येक जिल्हा/तालुका/शहर पातळीवर कार्यरत आहेत प्रत्येक पत्रकार संघटना आपआपल्या परीने पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवत असल्या तरी स्थानिक पातळीवर पत्रकारांतील एकमेकांच्या विषयी असलेली द्वेषभावना/मतभेद पत्रकारांच्या अधोगतीला कारणीभूत ठरत असल्यामुळे पत्रकारांमध्ये मतभेद निश्चितच नसायला हवे.

🌟भ्रष्ट नौकरशाह/भ्रष्ट राजकारणी आणि तस्कर माफियाशाहीशी हितसंबंध जनहीतवादी पत्रकारीतेस घातक :-

जनहीतवादी पत्रकारांनी केवळ जनहीताशी बांधिलकी जोपासत निर्भिडपणे वास्तववादी लिखाणाला प्राधान्य दिल्यास सर्वसामान्य जनतेला न्याय हक्कासाठी सरकारी कार्यालयांमध्ये चक्करा मारून आपली पायतान झिजवण्याची वेळ येत तर नाहीच याशिवाय भ्रष्ट कारभाराला काही प्रमाणात का होत नाही आळा निश्चितच बसत असतो परंतु पत्रकारीतेच्या बुरख्याआड लपून बेशर्मीचा कळस गाठत भ्रष्ट नौकरशाह/भ्रष्ट राजकारणी आणि तस्कर माफियाशाहीशी हितसंबंध जोपासण्याची प्रवृत्ती सातत्याने वाढत असल्यामुळे व स्वतःचा मोठेपणा सिध्द करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी रुजू होताच त्याने बोलावण्या अगोदरच त्याला स्वतःच भेटायला जाऊन स्वतःचा परिचय स्वतःच्यात तोंडाने देत एखादे पुष्पगुच्छ देऊन किंवा एखादा हार त्याच्या गळ्यात घालून स्वतःच्याच मुखातून स्वतःची वांहवा करीत जनहीतवादी पत्रकारांवर गरळ ओकणाऱ्या काही स्वयंघोषित लवचिक वृत्तपत्र पंडीतांमुळे वृत्तपत्र क्षेत्राकडे पाहण्याचा जनसामान्यांसह अधिकाऱ्यांचा देखील दृष्टिकोन फार वाईट होत असल्याचे दिसत आहे.

🌟जनहीतवादी पत्रकारांशी बरोबरी करण्याची क्षमता अंगी नसल्यामुळे त्यांच्या बदणामीचा मार्ग अगदी सोपा ?

शासकीय/निमशासकीय कार्यालयांतील अधिकारी,लोकप्रतिनिधी,राजकीय पक्ष पदाधिकारी तस्कर माफियाशाहीच्या दावणीला कायम बांधल्या गेलेल्या काही स्वयंघोषित पत्र पंडीतांमुळे भ्रष्ट बेईमानशाही राजेशाही थाटात संपूर्ण वृत्तपत्र क्षेत्रच आपल्या खिशात असल्यागत वावरत जनहीतवादी पत्रकारांना घडलेल्या घटना/दुर्घटना तसेच जनहीताच्या शासकीय योजनांसह गंभीर गुन्ह्यांची माहिती देण्याचे सातत्याने टाळत आहेच याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे काही ताटाखालील मांजर वगळता अन्य जनहीताशी बांधिलकी जोपासणाऱ्या पत्रकारांना अत्यंत तुच्छतेची वागणूक देखील देत असल्याचे निदर्शनास येत असल्यामुळे आता स्थानिक पातळीवर जनहीताशी बांधिलकी जोपासत निर्भिडपणे पत्रकारीता करणाऱ्या पत्रकारांनी एकत्रित येवून आपआपल्या पत्रकार संघटनांशी/तत्वांशी एकनिष्ठ राहून स्थानिक पातळीवर 'प्रेस क्लब'ची स्थापना करीत जनहीत/समाजहीताला प्राधान्य देत ग्रामीण भागातील स्वाभिमानी पत्रकारांच्या सुख-दु:खाशी एकमेकांच नात जोडण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे...


✍🏻परखड सत्य :- चौधरी दिनेश (रणजीत)

 


  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या