🌟परभणी जिल्ह्यात १५ मार्च २०२३ पर्यंत कलम ३६ लागू....!


🌟नियम व आदेशाचे उल्लंघन होणार नाही,याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक रागसुधा आर.यांनी केले🌟 

परभणी (दि.०१ मार्च): जिल्ह्यात होळी,धुलीवंदन असून, तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. या जयंतीनिमित्त जिल्यागूत विविध राजकीय पक्ष व संघटनांकडून ठिकठिकाणी मिरवणुका काढण्यात येतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी १ ते १५ मार्चदरम्यान मुंबई पोलीस कायद्यानुसार जिल्ह्यात कलम ३६ लागू केले असून, या कलमाच्या अधिकारानुसार परंतु कलम ३३ अन्वये केलेल्या कोणत्याही नियम व आदेशाचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक रागसुधा आर. यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. 

  जिल्ह्यात १ ते १५ मार्चदरम्यान मुंबई पोलीस कलम ३६ अंतर्गंत क, ख, ग, ड-१ (डक) (च) लागू करण्यात आले असून, या कलमाचे सर्वांनी पालन करावे. वरील आदेश लग्नाच्या वराती, प्रेतयात्रा व धार्मिक कार्यक्रमास लागू नाहीत. कोणी या आदेशाचे उल्लंघन केल्यास ती व्यक्ती मुंबई पोलीस कायदा कलम १३४ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील. वरील आदेश १ ते १५ मार्चपर्यंत लागू राहील, असेही त्यांनी कळविले आहे......  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या