🌟पुर्णेत हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मंजुरीसाठी मुख्यमंत्री मा.ना.एकनाथ शिंदें यांना भेटणार...!


🌟पुर्णा-पालम-गंगाखेड विधानसभा मतदार संघातील उभरते नेतृत्व नेते हाजी कुरेशी म्हणाले🌟


पुर्णा (दि.१५ मार्च) - पुर्णेतील शासकीय ग्रामीण रुग्नालय शहरापासून तब्बल तिन किलोमिटरच्या अंतरावर असल्यामुळे शहरातील शहरातील जनसामान्यांना शासकीय आरोग्य सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे शहरात मागील वर्षी साथीचे आजार ज्यात डेंग्यू सदृष्य ताप,काविळ,मलेरीया सारखे गंभीर जिवघेण्या आजारांची साथ फैलली असता शासकीय आरोग्य सुविधेपासून वंचित राहावे लागणे या अनेकांना आपला जिव देखील गमवावा लागला होता शहराच्या एकंदर लोकसंख्येच्या प्रमाणात गोरगरीब जनसामान्यांचे प्रमाण अंदाजे ३५% ते ४०% एवढे असून यात रोजमजूर/शेतमजूर किरकोळ व्यवसायिक हातावर पोट असलेल्या हमाल मापाडी,मागासवर्गीय अल्पसंख्यांक समाज आदींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून अश्या लोकांची संख्या शहरातील आण्णाभाऊ साठे नगर,कोळीवाडा,अजिज नगर,मस्तानपुरा/नवी आबादी,विजय नगर,छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरातील थुना नदी काठावरील नवीन वसाहत,डोबी गल्ली,भिमनगर,कुंभार गल्ली,शास्त्री नगर आदी भागांचा समावेश असून या भागातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेला शासकीय ग्रामीण रुग्नालय शहरापासून तब्बल ३ किलोमीटर अंतरावर असल्यामुळे शासकीय आरोग्य सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.


या संदर्भात पुर्णा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा पुर्णा-पालम-गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे उभरते नेतृत्व श्री.हाजी कुरेशी यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा आमचे नेते मा.ना.एकनाथभाई शिंदे यांनी नुकतीच राज्यात सर्वत्र पाचशें 'हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' या योजने अंतर्गत सुसज्ज असे शासकीय दवाखाने स्थापण करण्याची घोषणा केली असून पुर्णा शहरातील गोरगरीब सर्वसामान्य जनतेला देखील शासकीय आरोग्य सुविधांचा लाभ व्हावा याकरिता पुर्णा शहरात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना स्थापण करण्यात यावा याकरिता मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना दवाखान्याची मागणी करणार असल्याचे हाजी कुरेशी म्हणाले पुढे बोलतांना ते म्हणाले की शहरातील गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी मी सदैव तत्पर असून शहरातील जनसामान्यांच्या आरोग्य सुविधेला प्राथमिकता देऊन शासकीय दवाखान्यासह विविध नागरी सुविधांसाठी मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांना साकडे घालणारअसल्याचे ते म्हणाले.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या