🌟राजकिय पोळी भाजून घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या वेदनांच भांडवल बनवू नका - प्रशांत पाटील


🌟रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी दिला राजकीय पक्षांना निर्वानीचा इशारा🌟

✍️ मोहन चौकेकर 

चिखली (दि.०३ मार्च) - सत्ताधारी असोत की विरोधक असो आपली राजकिय पोळी भाजून घेण्यासाठी शेतकऱ्यांचा होत असलेला वापर थांबवा असे रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी म्हटले आहे.

राज्यातील प्रमुख पक्ष असलेले काँग्रेस असेल,राष्ट्रवादी काँग्रेस असेल,भाजप असेल किंवा शिवसेना असेल यांच्यासह सर्वच राजकीय पक्ष व राजकिय मलिदा लाटण्याची मनीषा अंगी बाळगून असलेले नेते हे फक्त नी फक्त शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचा आव आणत असतात योग्य वेळी आपल्याला हवा तसा वापर हे नेते मंडळी शेतकऱ्यांचा करत असतात,शेतकऱ्यांच्या वेदनांचे भावनिक प्रदर्शन करून विरोधक सत्ताधाऱ्यांना वेठीस धरत असतात तर सत्ताधारी हे  देखील तुटपुंजे अनुदान जाहीर करून भिकेच्या स्वरूपात वाटप करून शेतकऱ्यांचा वापरच करत असतात म्हणून आतातरी हे संधीसाधू नेते ओळखून शेतकरी बांधवांनी कुणावरच विसंबून न राहता शेतकऱ्यांनी स्वतः समोर येऊन आपल्या न्याय हक्कासाठी लढा देण्याची खऱ्या अर्थाने वेळ आलेली आहे,आपापले पक्ष, विचारसरणी दावणीला बांधून हे राजकारणी नेते जसे स्वार्थासाठी एका रात्रीतून एकत्र येतात तसे आपण देखील आता कुठले ही शेतकरी हिताचे प्रश्न असतील निवडणुका असतील त्यासाठी आपसी मतभेद विसरून एकत्र येणे गरजेचे असून यापुढे शेतकऱ्यांनी आपलं हित बघून व आपल्यासाठी कोण महत्वाचं आहे हे बघून आपल्यातीलच सामान्य शेतकरी प्रतिनिधिंना समोर करून पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल विधानसभा असेल लोकसभा असेल अश्या प्रत्येक ठिकाणी आपल्याच लोकांना निवडणुकीत संधी दयावी जेणेकरून आपण आपल्या लोकांच्या छाताडावर बसून आपल्या समश्या मार्गी लावू शकलो पाहिजे असे प्रशांत पाटील यांनी म्हटले आहे,

सभागृहात विरोधक महत्वाचे प्रश्न सोडून आपापसातील भांडणे व बऱ्याच अंशी फक्त नि फक्त शेतकऱ्यांच्या वेदनांचे प्रदर्शन करून त्याचे भांडवल बनवून महत्वाचा वेळ वाया घालवतांना दिसत आहेत तोच वेळ जर महत्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी वापरल्या गेला तर सत्ताधाऱ्यांकडून नागरीकांच्या हिताचे विधेयके मंजूर करून तो वेळ सत्कारणी लावल्यास राज्यातील सर्व सामान्य  नागरिकांसह शेतकऱ्यांचे ही हित नक्कीच साधेल म्हणून उगाच सत्ताधाऱ्यांना टार्गेट करण्यासाठी व स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी शेतकऱ्यांचा होत असलेला वापर या नेत्यांनी आतातरी थांबवावा असे रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी म्हटले आहे....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या