🌟परभणी येथे श्री भगवान झुलेलाल जन्मोत्सव व चेट्रीचंड (सिंधी नववर्ष) उत्साहाने साजरे....!


🌟शहरात सिंधी समाजबांधवातर्फेे भव्य शोभायात्रेचे आयोजन🌟 

परभणी (दि.२४ मार्च) : परभणीत दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सर्व सिंधी समाजबांधवांनी श्री भगवान झुलेलाल जन्मोत्सव व चेट्रीचंड (सिंधी नववर्ष) निमित्ताने गुरुवार दि.२३ मार्च २०२३ रोजी शहरातून जोरदार शोभयात्रा काढली.

             नारायण चाळ कॉर्नर भागातून गुरुवारी सकाळी ११-०० वाजता या शोभायात्रेस प्रारंभ झाला. शोभायात्रेच्या अग्रभागी श्री भगवान झुलेलाल यांची भव्य प्रतिमा होती. या शोभायात्रेत सर्व सिंधी समाजबांधव आपआपले दैनंदिन व्यवहार बंद ठेवून मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. आर.आर. टॉवर्स, अष्टभूजा चौक, गुजरी बाजार, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे ही पदयात्रा श्री भगवान झुलेलाल मंदिरापर्यंत काढण्यात आली. दरम्यान, या उत्सवानिमित्ताने ११ मार्चपासून सिंधी प्रिमिअर लिग क्रिकेट स्पर्धा, आनंद नगरी, मॅराथॉन स्पर्धा, सिंधी ऑर्केट्रा, फायर शो, कपल डे्र मॅचींग शो आदी उपक्रम हाती घेण्यात आले होते. यात सिंधी समाजबांधव, संत कंवरराम सेवा मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या