🌟पुर्णेत दि.२९ मार्च रोजी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या २३२७ व्या भव्य जयंती महोत्सवाचे आयोजन....!


🌟शहरातील भैय्यासाहेब आंबेडकर सभागृहात सम्राट प्रतिष्ठानच्या वतीने सम्राट अशोक यांच्या जयंती महोत्सवाचे आयोजन🌟

पुर्णा (दि.२६ मार्च) - पुर्णा येथील सम्राट प्रतिष्ठानच्या वतीने बुधवार दि.२९ मार्च २०२३ रोजी दुपारी ०१-०० वाजेच्या सुमारास शहरातील भिम नगर परिसरातील स्मृतीशेष भैय्यासाहेब आंबेडकर सभागृहात प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या २३२७ व्या भव्य जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 


या जयंती महोत्सवाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुज्य भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो महासचिव अखिल भारतीय भिक्खू संघ महाराष्ट्र प्रदेश व पुज्य भन्ते पय्यावंश बुध्द विहार पर्णा, पुज्य भन्ते संघरत्न यांची विशेष उपस्थित लाभणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिद्धार्थ भालेराव हे राहणार आहेत तर प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना (उध्दव ठाकरे) गटाचे परभणी जिल्हा प्रमुख विशाल कदम,भारतीय बौध्द महासभेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे,पुर्णा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक उतमभैय्या खंदारे,नगरसेवक ॲड.हर्षवर्धन गायकवाड,मिलिंद कांबळे महाराष्ट्र पोलिस,नगरसेवक मुकूंद भोळे,नगरसेवक अमजद नूरी,सेवा निवृत्त रेल्वे गार्ड गौतम लोभाजी जोंधळे आदी मान्यवर उपस्थित राहणार असून या सम्राट अशोक जयंती महोत्सवास बोधीसत्व डॉ.बी.आर.आंबेडकर स्मारक व बुध्द विहार समिती पूर्णा,भारतीय बौध्द महासभा पूर्णा व पुर्णेतील सर्व महिला मंडळांचे विशेष योगदान राहणार असून या जयंती महोत्सव कार्यक्रमा नंतर स्मृतिशेष अशोक कमलाकर गायकवाड यांच्या स्मरणार्थ उपा.गिरजाबाई अशोक गायकवाड यांच्याकडून खिरदान करण्यात येणार आहे.

या सम्राट अशोक जयंती महोत्सवास समाज बांधव भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जयंती महोत्सव कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन सम्राट प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रवी विजय गायकवाड,प्रविण किशन गायकवाड,ॲड.सिध्दांत गायकवाड,दिपक थोरात,अशोक भागवान वाघमारे,चंद्रशेखर गवळी, मनोज भवरे, अविनाश गायकवाड यांनी केले आहे...... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या