🌟पुर्णा येथील श्री गुरु बुध्दिस्वामी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा....!


🌟यावेळी अंतर्गत परीक्षक म्हणून महाविद्यालयाचे डॉ. गजानन कुरुंदकर यांनी परिक्षकाची भूमिका पार पाडली🌟

पूर्णा (दि.०१ मार्च) येथील श्री गुरु बुध्दिस्वामी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त भौतिक शास्त्र विभाग व आय. क्यू. ए. सी. विभागातर्फे पदवी विज्ञान च्या विद्यार्थ्यांसाठी “प्रभावशाली पावर पॉइंट“ ची स्पर्धा व राष्ट्रीय विज्ञान दिनावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. प्रमुख वक्ते व परीक्षक म्हणून नेताजी सुभाष चंद्रबोस महाविद्यालय नांदेड चे डॉ.मनीष देशपांडे उपस्थित होते. अंतर्गत परीक्षक म्हणून महाविद्यालयाचे डॉ. गजानन कुरुंदकर यांनी परिक्षकाची भूमिका पार पाडली.

प्रथमतः महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. राजकुमार, प्रमुख वक्ते डॉ.मनीष देशपांडे, उप प्राचार्य डॉ.संजय दळवी यांच्या हस्ते नोबेल पारितोषिक विजेते महान भारतीय शास्त्रज्ञ डॉ. सी. व्हीं रमण यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. कापुरे गंगाधर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. व डॉ.शेख राजू यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. यानंतर स्पर्धक विद्यार्थ्यांनी स्वतः चे पवार पॉइंट सादर केले. यामधून परीक्षकांनी प्रथम उमा शिखरे, द्वितीय प्रिया गव्हाणे, व तृतीय श्रुती काळे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. तसेच आरती गुडल या विद्यार्थिनीस प्रोत्सानपर पारितोषिक देण्यात आले अखेरीस प्रमुख वक्त्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व यावर विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण व्याख्यान दिले.

या प्रसंगी महाविद्यालयातील डॉ.राख आर.आर. डॉ.शेटे एस.बी., डॉ.मुसळे बी.बी. सहकार्य लाभले हा कार्यक्रम भौतिक शास्त्र विभागातर्फे आयोजित केल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. राजकुमार व उप प्राचार्य संजय दळवी यांनी भौतिक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. कापुरे गंगाधर, डॉ. शेख राजू कौतुक केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या