🌟सिद्धार्थ सोशल फाउंडेशन मुंबई संस्थापक अध्यक्ष संतोष धबाले यांचे समाजहित पानपोईला सदिच्छा भेट...!


🌟समाजहित अभियान प्रतिष्ठानच्या वतीने संतोष धबाले यांचा पुष्पहार घालून सत्कार🌟

परभणी (दि.१९ मार्च) : परभणी शहरातील समाजहितासाठी सामाजिक कार्य करणारी सामाजिक संस्था समाजहित अभियान प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या डॉ. आंबेडकर नगर, आय.टी.आय. कॉर्नर, जिंतूर रोड, परभणी येथील थंड जारच्या समाजहित पानपोईला मुंबई येथे कार्यरत असलेली सामाजिक संस्था सिद्धार्थ सोशल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष संतोष धबाले यांनी आज दिनांक 19 मार्च रोजी सदिच्छा भेट दिली. या भेटी दरम्यान समाजहित अभियान प्रतिष्ठानच्या वतीने संतोष धबाले यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. 

        या वेळी सत्काराला उत्तर देताना संतोष धबाले यांनी समाजहित अभियान प्रतिष्ठानने  सामाजिक उपक्रम राबविल्याने प्रतिष्ठानचे व सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक करून व समाजहित पानपोईला समाजाची बांधिलकी जपत देणगी देऊन  समाजहित अभियान प्रतिष्ठानच्या पुढील सामाजिक कार्याला शुभेच्छा दिल्या.

        या वेळी समाजहित अभियान प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष प्रमोद अंभोरे, सचिव जनसेवक रमेश घनघाव, राज्य प्रसिध्दी प्रमुख शेख अझहर, महा लोकतंत्र चे सिद्धांत सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते हरदिप सिंग बावरी, सदस्य शंकर बनसोडे, दीपक बनसोडे, प्रकाश अंभोरे, शाकेर भाई, अजय शिराळे, खदिर भाई, सुरेश जोंधळे, आदी पदाधिकारी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या