🌟परभणी जिल्हा काँग्रेस सोशल मिडियाने दिले पूर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावरील प्रवासी हिताच्या प्रलंबित मागण्यासाठी निवेदन...!


🌟रेल्वे स्थानक क्रमांक एकवर तिकीट खिडकीसह रेल्वे रुग्नालयात आरोग्य सुविधांसह तज्ञ डॉक्टर/नर्स उपलब्ध करुन देण्याची मागणी🌟

परभणी (दि.२१ मार्च) - मराठवाड्यातील सर्वात महत्वाचे व सर्वात मोठे रेल्वे जंक्शन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावरून चोवीस तासात तब्बल चाळीस प्रवासी एक्सप्रेस/पेसेंजर रेल्वे गाड्या धावतात परंतु दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे या महत्त्वपुर्ण पुर्णा रेल्वे जंक्शनकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे या स्थानकावर प्रवासी वर्गाला विविध समश्यांना सामोरे जावे लागते याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष द्यावे याकरता परभणी जिल्हा काँग्रेस कमेटी सोशन मिडियाचे जिल्हाध्यक्ष निखील धामणगावे मागील २०१८ पासून सातत्याने निवेदन देऊन पाठपुरावा करीत आहेत.

 परभणी जिल्ह्यातील पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावरील प्रवासी असुविधांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी काँग्रेस मिडियाचे जिल्हाध्यक्ष निखील धामणगावे यांनी सन २०१८ यावर्षी प्रथमतः दक्षिण मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सिकंद्राबाद यांना निवेदन देऊन पुर्णा-नांदेड या मार्गाच्या दिशेने पुर्णा रेल्वे स्थानकावर पादचारी पुल (दादरा) बांधण्याची मागणी केली होती ही मागणी प्रत्यक्षात पुर्ण झाली असून सदरील पादचारी पुलाचे काम पुर्ण झालेले आले.तसेच निवेदनात नांदेड डिव्हीजन साठी आरआरबी बोर्ड सुरु करण्याची व पुर्णेत स्पोर्ट स्टेडीयम आरसीसी ग्राऊंड स्थापण करण्याची देखील मागणी करण्यात आली होती यासह रेल्वे हायस्कुल मध्ये शिक्षकांची संख्या वाढवण्याची मागणी करण्यात आली होती परंतु दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने शिक्षकांची संख्या वाढवण्याऐवजी रेल्वे हायस्कुलच बंद केली ही अत्यंत दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल.

परभणी जिल्हा काँग्रेस मिडियाचे जिल्हाध्यक्ष धामणगावे यांनी यावेळी दिलेल्या निवेदनात पुर्णेत रेल्वे कोच दुरुस्तीसाठी रेल्वे कोच रिपेरींग शेडची देखील मागणी केली होती या कोच रिपेरींग शेडचे काम सद्या चालु असून त्यांनी रेल्वे स्थानक क्रमांक एकवर प्रवासी वर्गाला सहज तिकीट उपलब्ध व्हावे याकरिता रेल्वे स्थानक क्रमांक एकवर तिकीट खिडकी सुरु करण्याची मागणी देखील केली होती परंतु अद्याप देखील या मागणीवर रेल्वे प्रशासनाने विचार न केल्यामुळे परभणी जिल्हा काँग्रेस मिडियाचे जिल्हाध्यक्ष निखील धामनगावे यांनी दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सिकंद्राबाद यांना दि.२० मार्च २०२३ रोजी निवेदन देऊन पूर्णा येथील रेल्वे उपविभागीय वैद्यकीय दवाखान्यात सुविधा उपलब्ध करून देण्यासह रेल्वे स्थानक क्रमांक एकवर तिकीट खिडकी सुरू करण्याची मागणी करीत पुन्हा एकदा सन २०१८ यावर्षी दिलेल्या निवेदनातील मागण्यांचा पाठपुरावा केला असून यावर रेल्वे प्रशासन काय निर्णय घेते याकडे पुर्णेकरांचे लक्ष लागले असून निखील धामनगावे यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यांमूळे रेल्वे स्थानकावर नवीन पादचारी पुलाचे काम पुर्ण झाले तसेच त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे रेल्वे कोच रिपेरींग शेडच्या कामास देखील सुरुवात झाल्याने त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे....  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या