🌟परभणी येथे श्री.शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने काढली मूक पदयात्रा....!


🌟शहरातील शनिवार बाजारातून संध्याकळी मूक पदयात्रेस प्रारंभ करण्यात आला होता🌟

परभणी (दि.२२ मार्च) : परभणीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३४ व्या बलिदान दिनानिमित्त येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे काल मंगळवार दि.२१ मार्च २०२३ रोजी फाल्गून अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी मूक पदयात्रा काढण्यात आली होती.

           शहरातील शनिवार बाजारातून संध्याकळी मूक पदयात्रेस प्रारंभ करण्यात आला होता छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ छत्रपती संभाजी महाराजांना श्रध्दांजली वाहून या मूक पदयात्रेचा समारोप करण्यात आला. मागील एक महिन्यापासून संपूर्ण जिल्ह्यात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त हजारो श्रीशिव-शंभू पाईकांच्या वतीने काटेकोरपणे पालन करण्यात आले. दरम्यान, हजारो नागरिक,यूवक या मूक पदयात्रेत सहभागी झाले होते. यशस्वितेसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान परभणीच्या वतीने विशेष पुढाकार घेण्यात आला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या