🌟नांदेड येथील प्रभात नगर चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती उत्साहात साजरी....!


🌟देवानां प्रिय प्रियदर्शि धम्मराया चक्रवर्ती सम्राट अशोक यांचा विजय असो अश्या गगनभेदी घोषणा यावेळी देण्यात आल्या🌟

नांदेड : तथागत बुद्ध व त्यांचा महान धम्म यांचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण विश्वात झाला, असे ते  महान ' धम्मदायाद ' व संपूर्ण जगातील एकमेव चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या 2327 व्या जयंती महोत्सवाचे आयोजन आज बुधवार दि.29 मार्च 2023 रोजी सकाळी 11-30 वाजेच्या सुमारास येथील प्रभात नगर नांदेड येथील भैय्यासाहेब आंबेडकर बुध्द विहारात करण्यात आले होते.

यावेळी गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती ला अभिवादन करून,सम्राट अशोक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून साजरी करण्यात आली त्या वेळी उपस्थित जेष्ठ समाजसेविका भारतीबाई सदावर्ते, व सामाजिक कार्यकर्ते,संदीप वाटोरे, राहुल सुर्यतळे अर्जुन कंधारे, संबोदित कांबळे, अजिंक्य आठवले,कपिल लोखंडे, सोनू बुक्त्तरे, सौरभ कदम, तुषार खरे व चेतन भुजबळ, विशालराज वाघमारे, कुणाल भुजबळ, व सर्व मित्र परिवार प्रभात नगर नांदेड प्रभात नगर येथील सर्व बोद्ध उपासक उपासिका व नवयुवक उपस्थित होते या जयंती महोत्सवाचे आयोजन नवयुवक भिम जयंती मंडळ प्रभात नगर व धम्माश्रय युवा विचार मंच यांच्या वतीने करण्यात आले होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या