🌟पुर्णा येथील श्री.गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात जागतिक महिला दिना निमित्त भिंतीपत्रक स्पर्धा संपन्न....!


🌟कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव श्री अमृतराज कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते🌟

पुर्णा (दि.०८ मार्च) - पुर्णा येथील श्री.गुरु बुध्दिस्वामी महाविद्यालयात आज बुधवार दि.०८ मार्च २०२३ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व महिला सबलीकरण समितीतर्फे "स्त्री -पुरुष समानतेमध्ये तंत्रज्ञानाची भूमिका" या विषयावर भित्तिपत्रक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव श्री अमृतराज कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. राजकुमार, उपप्राचार्य डॉ. एस. एम. दळवी उपप्राचार्य श्रीमती शेख फातिमा, कार्यालयीन अधीक्षक श्री अरुण डूब्बेवार यांची उपस्थिती होती. यावेळी 21 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. भित्तिपत्रकाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा उपयोग आणि परिणामकारकता अशा विविध विषयांवर महत्वपूर्ण मांडणी करण्यात आली होती या स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. शिवसांब कापसे, डॉ. रेखा पाटील यांनी काम पाहिले. स्पर्धेचे आयोजन महिला सबलीकरणकक्ष च्या समन्वयक डॉ.अलका कौसडीकर, डॉ. चव्हाण पल्लवी डॉ. मोरे दिशा डॉ.आंबटकर वृषाली यांनी केले होते. या कार्यक्रमासाठी डॉ . दैवशाला कमठाने , डॉ. गंगासागर पुष्पा डॉ. रवी बरडे,डॉ. प्रकाश भांगे, डॉ.सोमनाथ गुंजकर, श्री अनिकेत शिंदे, श्री शुभम बिबेकर, डॉ. जयश्री स्वामी, डॉ. स्मिता जमदाडे,  डॉ . मनिषा पाटिल, डॉ. वर्षा धुतमल, श्रीमती पुष्पा श्रीरसागर ,श्रीमती महाजन सारिका, श्रीमती साधना गंडरघोळ उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी भगूसिंग बायस व गजानन भालेराव यांनी परिश्रम घेतले.  सदरील कार्यक्रमाच्या यशस्वी संयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.श्री प्रमोदअण्णा एकलारे व संस्थेचे सहसचिव मा.श्री गोविंदराव कदम यांनी संयोजकांचे कौतुक केले..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या