🌟परभणीत मोटारसायकल हलवल्याच्या कारणावरून एकास टोळक्या कडून बेदम मारहाण....!


🌟शहरातील नवा मोंढा परिसरातील घटना : कोतवाली पोलिस स्थानकात ०८ जनांच्या विरोधात गुन्हा दाखल🌟

परभणी (दि.२५ मार्च) : परभणी शहरातील मोंढा परिसरात रस्त्यावरील उभी मोटारसायकल का हलवली म्हणून ०८ जणांच्या टोळक्याने येथील बांधकाम व्यवसायिक विक्रांत जोगळेकर यांना बेदम मारहाण केली.

परभणी शहरातील नवा मोंढा परिसरातून गुरुवार २३ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ०७-०० वाजेच्या सुमारास आपण पत्नी व आईसह देवदर्शनाकरीता एम.एच. ४७ ए.एन.९१४७ या क्रमांकाच्या कारमधून निघालो होतो. त्यावेळी कात्नेश्‍वरकर हॉस्पिटलच्या कॉर्नरवरील रस्त्यावर एक कार व दोन मोटारसायकल उभ्या होत्या. आपण कारखाली उतरुन मोटारसायकल पार्कींगमध्ये लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोघांनी ‘तू मोटारसायकल का हलवली’ असे म्हणत वाद घातला. परंतु, ‘तू येथून रस्त्याने ये-जा असा करतो हे बघतोच’ असे म्हणून त्या दोघांनी धमकी दिली. आपण कुटूंबियांसह पावणे आठच्या सुमारास परतलो तेव्हा, याच वळणावर दहा ते बारा जणांचे टोळके हातात काठ्या घेवून थांबले होते. आपण कार तशीच पुढे नेली तेंव्हा पाठीमागून कारवर टोळक्यांनी दगडफेक केली. पाठोपाठ आपल्या घरासमोर अंगावर येवून लाथाबुक्क्यांनी तोंडावर, छातीवर, पाठीवर प्रहार केले. तोंडातून, नाकातून रक्त निघत होते. त्यातील काहीजण आपल्या पत्नीच्या अंगावरही धावून गेले. आसपासच्या काही मंडळींनी हा प्रकार थांबविण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या टोळक्याने जातानाही शिवीगाळ करीत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या, असे जोगळेकर यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले. या आधारे कोतवाली पोलिसांनी प्रथमेश शर्मा, विनोद शर्मा, सरांडे व सोमाणी यांच्यासह आठ जणांविरुध्द गुन्हे दाखल केले आहेत.

               दरम्यान, जोगळेकर यांनी या प्रकरणात पोलिसांनी कठोर भूमिका घ्यावी व टोळक्यांचा बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या