🌟या देशाची महिला ईडीला घाबरणार नाही - मेधाताई पाटकर


🌟असं प्रतिपादन नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या,जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर यांनी केले🌟

पूर्णा (दि.१३ मार्च) - या देशाची महिला ईडीला घाबरणार नसून महिला सशक्तीकरनाच्या गप्पा मारणाऱ्या सरकारने टिस्टा सॅटेलवाड याला सरकारने जाणून बूजून तुरुंगात टाकले टिस्टाच्या पाठीमागे जर आम्हालाही तुरुंगात जावे लागले तर देशाची प्रत्येक महिला तयार आहे असं प्रतिपादन नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या, जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर यांनी केले.

      पूर्णा शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात शनिवारी ११ मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून नईदिशा फाऊंडेशन व ताज फाउंडेशनच्या वतीने बेटी बचाव बेटी पढाओ व जागर स्त्री शक्तीचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते प्रसंगी मेधाताई पाटकर ह्या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून काॅ. अँड माधुरीताई क्षिरसागर, मंचावर नायब तहसीलदार वंदना मस्के ,अंजना बिळगर,पुष्पां बनसोडे,प्रकाशदादा कांबळे,उत्तमभैय्या खंदारे, पो.नि.सुभाष मारकड,दादाराव पंडित,रौफ कुरेशी,युवा नेते शेख सोहल शेख खुद्दुस,रौफ बागवान नागेश एंगडे,आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रस्तावित मुख्य संयोजक सय्यद अतिक यांनी केले.पूढे बोलताना श्रीमती पाटकर म्हणाल्या की,देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली आहेत. या काळात जो काही संवाद जनता आणि सरकार यात होत होता, तो पूर्णपणे संपुष्टात आणण्याचं काम केंद्रातील सरकारकडून होत आहे. म्हणून देशातील भूकेली, तहानलेली कष्टकरी माणसांसह महिलांनाही चळवळीचा मार्ग अवलंबावा लागतो है दुर्दैवी आहे.नशा मुक्तीवर शासनाच्या वतीने अनेक कार्यक्रम राबवले परंतु शासनाने नशामुक्तीपेक्षा भुक मुक्ती आणि बेरोजगार मुक्ती करावी ही काळाची खरी गरज आहे. कृषी कायद्यामुळे भविष्यात अन्नसुरक्षा धोक्यात येण्याची भीती आहे. त्यामुळे केवळ शेतकरीच नाही, तर राशन धान्य दुकानावर अवलंबून असणाऱ्या सामान्य नागरिकांचाही जेवणाचा प्रश्न निर्माण होणार आहे. देशात केंद्रातील सत्ताधाऱ्यांकडून चळवळी दडपल्या जात आहेत,देश उद्योगपतींच्या हातात सोपवला जात आहे.आणि सरकारने शिक्षणाचा जो नवीन कायदा आहे तो बाजारी करणं करणार आहे याचेपरिणाम भविष्यात फार गंभीर होतील. यामुळेच सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे.अध्यक्षीय समारोपात अँड माधुरी क्षिरसागर यांनी बोलताना सरकारने संघातील माणसे घेऊन शिक्षण समिती तयार करून येणाऱ्या पिढीचा मोठे नुकसान करण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप केला

तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शेख खुददुस शेख बशिर,स आजम,नसीर सर ,भूषण भुजबळ, गौतम येगडे, शेख नइम ,स खाजा, राजु पूडगे, सह आदी दिशा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमात महिला बचत गटाना सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या