🌟जंग-ए-आजितन्युज हेडलाईन्स - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/बातम्या....!


🌟खासदार इम्तियाज जलिल यांचे औरंगाबाद नावासाठी साखळी उपोषण सुरू🌟

✍️ मोहन चौकेकर

* देशात उभारण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांमुळे देशाचा कायापालट होईल -- पंतप्रधान नरेंद्र मोदी 

* साडे दहानंतर विद्यार्थ्यांस परीक्षा केंद्रात प्रवेश बंदी, परीक्षेदरम्यान होणारी पेपरफुटी टाळण्यासाठी बोर्डाने जारी केले पत्रक

* WPL चा रंगतदार उद्घाटन सोहळा: कियारा अडवाणी आणि किर्ती सेनेनचे धमाकेदार नृत्य; गायक ढिल्लनचेही सादरीकरण

* त्रिपुरा राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत, 8 मार्च रोजी त्रिपुरातील शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार 

* कोरोना लस sputnik v बनवणाऱ्या बोटिकोव्ह या संशोधकाची हत्या; बेल्टने घोटला गळा, मॉस्कोतील घरात आढळला मृतदेह

* एका कार्यक्रमात घाई गडबडीत आणि अनावधानानं बेळगावचा उल्लेख 'बेळगावी' झाल्याचा खुलासा, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी व्यक्त केली दिलगिरी

* छत्रपती संभाजीनगरमध्ये नामांतराविरोधात उपोषण सुरू, खासदार इम्तियाज जलिल यांचे औरंगाबाद नावासाठी साखळी उपोषण सुरू

* मनसे नेते संदीप देशपांडेंचा आरोप: BMCतील घोटाळा बाहेर काढल्याने हल्ला, प्रसिद्धी मिळवण्यासाठी असे आरोप- वरुण सरदेसाई

* युट्युबरने 3.15 कोटींची लॅम्बोर्गिनी कार फोडली; रशियन युट्युबर मिखाईल लिटविन याने 'Lit Energy' या एनर्जी ड्रिंक ब्रँडच्या जाहिरातीसाठी वापरली स्वतःची कार

* पिंपरी चिंचवडमध्ये विजय हा जगताप पॅटर्नमुळे, भाजपमुळे नव्हे; महाविकास आघाडीने एकजूट दाखवली तर 2024ला राज्यात सत्ता येईल -संजय राऊत

* वंदे भारत सेमी हायस्पीड एक्स्प्रेस मुंबई-गोवा मार्गावर धावणार; केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची माहिती

* मनीष सिसोदिया यांच्या सीबीआय कोठडीत दोन दिवसांची वाढ; 10 मार्च रोजी होणार जामीन अर्जावर सुनावणी

* तुनिषा शर्मा हत्याकांड प्रकरणातील आरोपी शिझान खानला 1 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

* किरीट सोमय्यांचे रवींद्र वायकरांवर गंभीर आरोप:मुंबई मनपाच्या जागेवर 500 कोटींच्या 5 स्टार हॉटेलचे बांधकाम सुरू असल्याचा दावा

* नायब तहसीलदारांचे धरणे : 3 एप्रिलपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा, वेतनश्रेणी वाढवण्याची मागणी

* जाणता राजा या महानाट्याचे प्रयोग शिवाजी पार्क मैदानावर १४ ते १९ मार्चपर्यंत रोज सादर करण्यात येणार

* वर्धा जिल्ह्यात एकदिवसीय स्टार्ट अप स्पर्धा आणि मार्गदर्शन शिबिराचं आयोजन

* राज्यात अनुसूचित जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्रांबाबत अनेक तक्रारी, राज्यात जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी नवीन धोरण आणणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

* राज्यातील कुटुंब न्यायालयांची संख्या वाढणार, सद्यस्थितीत राज्यात 37 कुटुंब न्यायालये कार्यरत असून सहा अतिरिक्त कुटुंब न्यायालये स्थापन होणार

* नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि अनुसंधान केंद्र विस्तारीकरणाच्या प्रकल्पास निधी मंजूर, जागेसंदर्भात लवकरच बैठक घेऊन निर्णय होणार

* उद्धव ठाकरेंचा राष्ट्रवादीला झटका! उद्या कोकणातील संजयराव कदम कार्यकर्त्यांसह तर गुहागरमधील राष्ट्रवादीचे बहुसंख्य कार्यकर्ते उद्धव ठाकरेंच्या गटात प्रवेश करणार

* WPL चा रंगतदार उद्घाटन सोहळा: कियारा अडवाणी आणि क्रीती सेनेनचे धमाकेदार नृत्य; गायक ढिल्लनचेही सादरीकर 

✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या