🌟जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके यांची परभणी आकाशवाणी केंद्रावर मुलाखत....!

 


🌟ही मुलाखत निवेदक आनंद पोहनेरकर यांनी घेतली आहे🌟

परभणी (दि.३० मार्च) :  येथील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके यांची परभणी आकाशवाणी केंद्रावरून उद्या शुक्रवार दि.३१ मार्च २०२३ रोजी सकाळी १०:३० वाजता मुलाखत प्रसारित होणार आहे ही मुलाखत निवेदक आनंद पोहनेरकर यांनी घेतली आहे.

जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या पुढाकारातून  'बालविवाहमुक्त परभणी' हे अभियान सुरू करण्यात आले आहे. याच संदर्भात 'परभणी जिल्हा बालविवाह मुक्त करूया' याविषयी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके यांची परभणी आकाशवाणीवरून मुलाखत प्रसारित होणार आहे. बालविवाहमुक्त परभणी अभियानाचे मुख्य उद्दिष्ट, त्याविषयीची जनजागृती, त्यासाठी जिल्ह्यातील अबालवृद्धांची जबाबदारी, बालविवाहामुळे होणारे मुलींचे शारीरिक, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक बाबींवर होणारे दुष्परिणाम, समाजाने जागरूक होऊन या बालविवाहाच्या लढ्याविरोधात उभे राहण्याचे आवाहन या बाबींवर ते या मुलाखतीच्या माध्यमातून बोलणार आहेत. श्री. तिडके यांच्या कार्यकाळात गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणावर बालविवाह थांबविण्यात जिल्हा प्रशासनाला यश मिळाले आहे.
*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या