🌟पुणे येथील कसबा पोटनिवडणूकीतील महाविकास आघाडीच्या विजयाचा गंगाखेडात आनंदोत्सव...!


🔹आत्मविश्वास वाढवणारा विजय - गोविंद यादव 

गंगाखेड : पुणे येथील कसबा पोटनिवडणूकीत कॉंग्रेसचे ऊमेदवार रविंद्र धंगेकर हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. महाविकास आघाडीच्या या विजयाचा गंगाखेडात फटाके फोडत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. हा विजय महाविकास आघाडीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आतामविश्वास वाढवणारा असल्याची भावना या प्रसंगी बोलताना कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी व्यक्त केली.

पोटनिवडणूकीचा निकाल येताच कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकत्र आले. महाविकास आघाडीच्या विजयाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवले. तसेच फटाक्यांची आतीषबाजी करण्यात आली. बॅंडबाजासह कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीने डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर दणाणून गेला होता. 


या प्रसंगी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, शहराध्यक्ष शेख युनूस शिवसेना जिल्हा ऊपप्रमुख विष्णू मुरकुटे, शिक्षक सेनेचे सरचिटणीस बाळासाहेब राखे, तालुकाप्रमुख अनिल सातपुते, राष्ट्रवादीचे युवानेते ॲड. मिथीलेश केंद्रे, युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस प्रणित खजे, सिद्धार्थ भालेराव, नागेश डमरे, कॉंग्रेस अ. जा. विभागाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर साळवे, सदाशिवराव कुंडगीर, दत्तराव भिसे, दशरथराव काळे, संदिप राठोड, शिवा घोबाळे, जगन्नाथ मुंडे, धोंडीराम जाधव, ईंद्रजीत हाके, माजी नगरसेवक अजीजभाई, रणधीर भालेराव, ॲड. मोहन सानप, कासले, चंद्रकांत खंदारे, बंटी कचरे, बंटी मेहत्रे, संग्राम पवार, अजीत लांडगे, रोहित चंदेल, मोसीन शेख, युनूस पठाण, सुरेश साळवे, बाळासाहेब सोनटक्के, सुहास देशमाने आदिंसह तीन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते ऊपस्थित होते. गोविंद यादव, बाळासाहेब राखे, ॲड. मिथीलेश केंद्रे, शेख युनूस, प्रणित खजे, विष्णू मुरकुटे यांनी मनोगते व्यक्त केली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या