🌟परभणी येथे पाच दिवसीय कृषी महोत्सव संपन्न.....!


🌟कृषी महोत्सवात आमदार डॉ.रत्नाकर गुटे यांचे फळ देऊन करण्यात आले स्वागत🌟   

परभणी (दि.०१ मार्च) - सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक श्रीमती. स्वाती घोडके आत्मा परभणी,कृषी संजीवनी कृषी महोत्सव हा पाच दिवसीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला होता सदरील कृषी महोत्सवाचे आयोजन आनंदराव भरोसे यांनी गेल्या दोन वर्षापासून अतिशय यशस्वीरित्या केलेले आहे, या महोत्सवाचे हे तिसरं वर्ष आहे यावेळी कृषी महोत्सवाला उपस्थित आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांना फळ देऊन स्वागत करण्यात आले.


या कृषी महोत्सवात विजयकुमार लोखंडे जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा परभणी, हरणे सर उपविभागीय कृषी अधिकारी,. प्रभाकर बनसावडे उपप्रकल्प संचालक आत्मा परभणी, . नित्यानंद काळे तालुका कृषी अधिकारी परभणी, आणि आमचं महाराष्ट्र शासनाचा कृषी विभागाचे हे दालन उभारण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आलेले  कैलास गायकवाड सर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या कृषी संजीवनी महोत्सवामध्ये कृषी विभागाचे दालन उभारणी केली आहे, आज या कृषी महोत्सवाचा पाचवा दिवस आहे गेल्या चार दिवसापासून या कृषी महोत्सवात हजारो शेतकऱ्यांनी भेट देऊन वेगवेगळे योजनेची माहिती घेतली जसे की, आत्मा, पोकरा, पी. एम. एफ. एम. इ. महाडीबीटी आणि आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ आम्ही साजरा करत आहोत त्यानिमित्ताने पौष्टिक तृणधान्य विषयी आहारामधील महत्त्व व फायदे या सर्वांची माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी आम्हाला एक संधी मिळाली आहे, प्रत्येक शेतकऱ्यांना या वेगवेगळ्या योजनेची माहिती गेल्या चार दिवसापासून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली ही माहिती या कृषी संजीवनी महोत्सवामुळे इतक्या लवकर आम्ही देऊ शकलो या कृषी संजीवनी महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही ही माहिती हजारो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकलो  आनंद भरोसे साहेब यांचे खूप खूप आभारी आहोत, तसेच या कृषी महोत्सवामध्ये आत्मअंतर्गत स्थापन झालेले महिला व पुरुषाचे गट जे की प्रक्रिया उद्योग करतात अशा गटांनी आपल्या प्रक्रिया केलेले सर्व पदार्थ येथे विक्रीस ठेवले आहेत, तसेच गटांतर्गत सेंद्रिय शेती व इतर योजनेचे लाभ घेतलेले शेतकरी त्यांनीही येथे दालन उभारणी केली आहे. अशाप्रकारे या कृषी महोत्सवामध्ये शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला व हा कृषी महोत्सव यशस्वीरित्या पार पडला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या