🌟परभणीत वृक्षांना रंगवून प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने अनोख्या पध्दतीने रंगपंचमी साजरी....!


🌟वृक्षांची आकर्षक रंगरंगोटी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वतः आपल्या हाताने केली🌟

परभणी (दि.०८ मार्च) - प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून प्रहार जनशक्ती पक्ष परभणीने शाळेतील वृक्षांना रंगवून अनोख्या पध्दतीने रंगपंचमी साजरी केली, वृक्षांची आकर्षक रंगरंगोटी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वतः आपल्या हाताने केली हे विशेष.

वृक्ष हे पर्यावरण संतुलनाचे काम करत असतात शिवाय जीवसृष्टीस मोठ्या प्रमाणावर प्राणवायू देत असतात. त्यामुळे त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेमध्ये वेगळ्या पध्दतीने वृक्षांना रंगरंगोटी करुन मुलांना वृक्षा विषयी प्रेम निर्माण व्हावे व शाळेचे सौंदर्य वाढावे यासाठी हा अनोखा उपक्रम घेण्यात आला. यावेळी परभणी शहरातील उघडा महादेव परिसरातील आदर्श विद्या मंदीर या शाळेतील व परिसरातील २५-३० वृक्षांची रंगरंगोटी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली.

यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, अंकुश गिरी, पिंटू कदम, रामेश्वर पुरी, मिडीया प्रभारी नकुल होगे, शहर चिटणीस वैभव संघई आदी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या