🌟परभणी जिल्ह्यात नाफेडच्या माध्यमातून किमान हमी दरानुसार हरभरा खरेदी केंद्रांची संख्या तातडीने वाढवा...!


🌟राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख यांची मागणी🌟

परभणी (दि.10 मार्च) : परभणी जिल्ह्यात नाफेडच्या माध्यमातून किमान हमी दरानुसार हरभरा खरेदी केंद्रांची संख्या तातडीने वाढवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख यांनी केली आहे.

              राज्याचे सहकार मंत्री अतूल सावे यांना सादर केलेल्या निवेदनातून तालुकाध्यक्ष देशमुख यांनी परभणी जिल्ह्यात 21.69 लाख क्विंटल हरभरा उत्पादन अपेक्षित आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्पन्नाच्या तूलनेत या जिल्ह्यात नाफेडच्या माध्यमातून केवळ आठच केंद्रांवरुन खरेदी सुरु आहे. जिल्ह्यातील वाढलेले हरभरा क्षेत्र व प्रति हेक्टर उत्पादकता पाहता हरभरा खरेदीत सुसूत्रता आणण्याकरीता अधिक हरभरा खरेदी केंद्रे प्राधान्याने सुरु करणे गरजेचे आहे, असे नमूद केले. राज्यात नाफेडच्या माध्यमातून हरभरा खरेदीचे उद्दिष्ट 8.10 लाख टन निश्‍चित करण्यात आले आहे. वास्तविकतः राज्यात हरभरा पिकाखालील क्षेत्र 29.67 लाख हेक्टर असून एकूण रब्बी क्षेत्राच्या 48.1 टक्के एवढे आहे. तूलनेत महाराष्ट्रातील हरभरा खरेदीचे उद्दिष्ट 8.10 लाख टन म्हणजे खूपच कमी आहे. हरभरा खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्याबरोबर एकूण हरभरा खरेदीचे उद्दिष्ट वाढविणेही गरजेचे आहे, तरच शेतकर्‍यांना दिलासा मिळेल, असे मत तालुकाध्यक्ष देशमुख यांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या