🌟.....'यालाच म्हणतात अवघड जागेच दुःखन सांगताही येत नाही अन् सहनही होत नाही'.....!


🌟पुर्णेतील राष्ट्रीयकृत बँकांचे 'एटीएम' अहो कसल ऑल टाईम मनी ? यांची अवस्था तर ऑल टाईम नॉट अवलेबल मनी🌟

पुर्णा (दि.०५ मार्च) - राष्ट्रीयकृत बँकांनी ग्राहकांच्या सुविधेसाठी जागोजाग एटीएम अर्थात 'ऑल टाईम मनी' ची व्यवस्था केली खरी परंतु या 'राम भरोसे' चालणाऱ्या एटीएमची अवस्था 'अवघड जागेच दुःखन सांगताही येत नाही अन् सहनही होत नाही' अश्या प्रकारची झाली असून या कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नसलेल्या एटीएम केंद्रांवर कधी मोकाट गाढव/मोकाट गाई/वळू तर कधी एटीएम धारकांच्या मागावर राहून एटीएमची अदला बदल करीत त्यांच्या अकाऊंटवर डल्ला मारणाऱ्या भुरट्या भामट्यांचे देखील 'मजबूत नियंत्रण' राहत असल्याचे मागील घडलेल्या काही घटनांवरून निदर्शनास येत असून याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे शहरातील राष्ट्रीयकृत बँकांची सुविधा केंद्रे सुध्दा बँक खातेदार/बँक ग्राहकांसाठी अक्षरशः दुविधा केंद्र ठरत असून संबंधित सुविधा केंद्र चालक बँक खातेदार/ग्राहकांची मनमानी पध्दतीने आर्थिक पिळवणूक करीत असून बँक खातेदार/ग्राहकांना अत्यंत सोईस्कर वाटणारी एटीएम सुविधा जाणीवपूर्वक बंद किवा एटीएम मशीन मध्ये बिघाड करून खातेदार/ग्राहकांना सुविधा केंद्रांकडे जाण्यास मजबूर करीत बँक खातेदार ग्राहकांचा आर्थिक बळी देण्याचा एक भाग तर नव्हे ना ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


राष्ट्रीय बँकांसह एटीएमची जवाबदारी असलेल्या संस्थांनी जागोजाग उघडलेल्या एटीएम केंद्रांची अवस्था एखाद्या जनावरांच्या बेवारस आश्रयस्थानां प्रमाणे झाल्याने या एटीमकडे मोकाट जनावरांसह मनुष्यरुपी भुरट्या/भामट्या गिधाडांची देखील वक्रदृष्टी सातत्याने राहत असतांना संबंधित बँकांचे अधिकारी/कर्मचारी व एटीएम नियंत्रित करणाऱ्या संस्था मात्र सातत्याने बेजवाबदार पणाचे प्रत्यय आणून देत असून एटीएम केंद्र उघडा असले तर त्यातील एटीएम मशीन मध्ये पैसाच उपलब्ध राहत नाही अन् पैसा जर उपलब्ध असेल एटीएम मशीन मध्ये सर्रास बिघाड झालेला असतो याही पुढे सांगायचे म्हणजे एटीएम मध्ये पैसे काढण्यास गेलौयास एकतर भुरट्या भामट्यांची भिती नसता मग एटीएम मध्ये मोकाट जनावरांचे वास्तव्य...त्यामुळे पुर्णा शहरातील एटीएमची अवस्था एटीएम ग्राहकांसाठी असून अडचन नसून खोळंबा अशी झालेली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या