🌟प्रहार जनशक्ती पक्ष महिला आघाडीच्या वतीने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान....!


🌟यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ.माधवीताई घोडके पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟


परभणी (दि.०९ मार्च) - जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रहार जनशक्ती पक्ष महिला आघाडीच्या वतीने शहरांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला यात परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा मॅडम यांचा तसेच पोलीस शहर वाहतूक नियंत्रण शाखेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान प्रहार जनशक्ती पक्ष महिला आघाडी च्या वतीने करण्यात आला.

यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ.माधवीताई घोडके पाटील, शहर चिटणीस ॲड. सुवर्णाताई देशमुख, उपशहर प्रमुख सौ. सुषमाताई देशपांडे, विभाग प्रमुख सौ.मनीषाताई रेंगे, सौ.सोनाली ताई गूठे सौ.आरतीताई सावंत इत्यादी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या