🌟राज्यासह जिल्ह्यातील शहर/गाव पातळीवर राष्ट्रीय/सामाजिक एकात्मता जोपासण्यासाठी शिव्या/दारुसह कचरामुक्त होळी साजरी करा...!


🌟मित्रांनों...राष्ट्रीय सामाजिक एकात्मता जोपासणारा सन म्हणून आता यापुढे होळी/धुळीवंदन साजरी करुया🌟 


महाराष्ट्र राज्यात सर्वत्र आज सोमवार दि.०६ मार्च ते ०७ मार्च २०२३ या दोन दिवस प्रथमतः आज होळी पेटवून होळीचा सन तर दुसऱ्या दिवशी विविध रंगांसह गुलालाची उधळन करीत धुळमातीचा सन अत्यंत उत्साहपुर्ण वातावरणात सर्वत्र साजरा केला जात असतांना मात्र गाव/शहरातील काही भागात मात्र वर्षभरातील द्वेष भावनांना वाट मोकळी करून समाजातील दृष्टप्रवृत्ती मात्र आपल्या आसूरी प्रवृत्तीचा प्रत्यय देत आपल्या विरोधकांसह अन्य धर्मिय/समाज बांधव अल्पसंख्याक समाजातील समाज बांधवांना धार्मिक अल्पसंख्यांकांना व आपले कर्तव्य अत्यंत चोखपणे बजावणाऱ्या शासकीय/प्रशासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांना अक्षरशः गलिच्छ भाषेत शिव्यांची लाखोटी वाहत या राष्ट्रीय/सामाजिक एकात्मता घडवून आणणाऱ्या सनाला गालबोट लावण्याचे दुष्कृत्य करीत असतात त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न तर निर्माण होतोच याशिवाय एकमेकांची मन देखील दुभंगली जातात या सर्व घटनांचा फायदा काही तत्वभ्रष्ट राजकीय मंडळींसह समाजातील समाजकंठक प्रवृत्ती देखील घेण्याचा प्रयत्न करीत आपला उद्देश साध्य करीत असते.


 दरम्यान या सर्व गंभीर घटनांत आगीत तेल ओतन्याचे काम करते ती व्यसनाधिनता त्यामुळे समाजातील सुज्ञ समाजबांधव तरुण पिढीने होळी या सनाला एक संकल्प निश्चितच करायला हवा की होळीतर साजरी करायची पण ती सुध्दा सर्वत्र स्वच्छता राहावी व आपले शहर स्वच्छ व सुंदर दिसावे याकरिता कचरा/प्लास्टिक मुक्त होळी....एकमेकां विषयी मनात असलेल्या द्वेष भावनांना अग्नी देऊन द्वेषमुक्त होळी....दारु/गांजा/गुटखा/तंबाखूसह विविध नशील्या पदार्थांच्या सेवनाला कायम मुठमाती देऊन नशामुक्त होळी...त्यामुळे सामाजिक/राष्ट्रीय एकात्मता जोपासली जाईल व कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उपस्थित होणार नाही ज्याने करुन आपल्या शहर/गावाला अतिसंवेदनशिलतेचा कलंक लागणार नाही....त्यामुळे या होळीच्या सनाचे औचित्य साधून तुम्हा आम्हाला राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचा दृढ संकल्प करायचा आहे.


परभणी जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात अल्पशः काळात नावलौकिक केलेल्या राष्ट्रजन फाउंडेशनचे अध्यक्ष तथा स्वच्छता दूत नितीन जाधव गोगलगावकर यांनी तरुणांना केलेले आवाहन निश्चितच कौतुकास्पद म्हणावे लागेल त्यांनी असा संदेश दिला आहे की होळी साजरी करा कचरा मुक्त....प्लास्टिक मुक्त....नशा मुक्त आणि शिव्या मुक्त अशी होळी साजरी करतांना धार्मिक उत्साहात सर्वांनी आपआपल्या परिसरात धार्मिक देवस्थान अर्थात मंदिरांच्या जवळ किंवा मंदिराच्या परिसरामध्ये नगरातील व गावातील सर्वांनी एकत्र येऊन स्वच्छता परिसर करण्यात यावा आणि शिवा मुक्त होळी साजरी करावी यावेळी व्यसनमुक्ततेचा संदेश देऊन कोणी साजरी करण्याची संकल्पना कोणीही मद्यपान किंवा अन्य नशील्या पदार्थांचे सेवन करू नये असे आव्हान देखील त्यांनी केले आहे त्यामुळे त्यांच्या आदर्श विचारांचे अनुकरण प्रत्येकाने निश्चितच करायलाच हवे

दृढ संकल्प करा मित्रांनो.....


होळी समाजात फोफावलेल्या अपप्रवृत्तीं/अनैतिकतेची....होळी एकमेकांच्या मनातील द्वेष भावनांची....होळी समाजातील वाईट प्रथांसह असंस्कृतपणाची....होळी दारू/तंबाखू/सिगार/गुटखा/गांजासह विविध व्यसनांची....होळी शेतकरी/शेतमजूर/रोजमजूर अन् समाजातील दिन दुबळ्या गोर गरीबांचा अनादर करणाऱ्या प्रवृत्तींची....

अन् दृढसंकल्प सुसंस्कृत समाजासह एकमेकांच्या सामाजिक/धार्मिक भावनांचा आदर करीत सामाजिक/राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचा...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या