🌟परभणी जिल्ह्यातील मानवत जवळ झालेल्या भीषण अपघाताने घेतला २ शिक्षकांचा बळी...!


🌟भिषण अपघातातात मानवत येथील शकुंतला विद्यालयातील दोन शिक्षकांचा जागीच मृत्यू 🌟

परभणी (दि.१४ मार्च) : परभणी जिल्ह्यातील मानवत शहरातून जाणाऱ्या कल्याण-निर्मल राष्ट्रीय महामार्गावर आज मंगळवार दि.१४ मार्च २०२३ रोजी सकाळी ०८-१५ वाजता झालेल्या एका भीषण अपघातात मानवत येथील दोघां शिक्षकांचा जागीच मूत्यू झाला.

मानवत येथील शकुंतला विद्यालयातील दोन शिक्षक रामेश्वर कदम व गंगाधर राऊळ हे आपल्या दुचाकी क्र.एम.एच.२२ ए.एच.७०३१ ने शाळेकडे येत असताना पाथरीहुन परभणीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक एम.एच.१३ आर ३६८४ ने मोटारसायकला जोरदार धडक दिली यात दोघाही शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला अपघात झाल्यानंतर ट्रकचालक जागेवरून फरार झाला आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या