🌟पुर्णेकडून नांदेडकडे भरधाव येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने मोटारसायकल स्वार पती-पत्नीस उडविले...!


🌟पती जखमी तर पत्नीचा जागीच मृत्यू : अज्ञात कार चालकांवर चुडावा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल🌟

पुर्णा (दि.१३ मार्च) - पुर्णा-नांदेड राज्य महामार्गावर अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून या मार्गावर सुसाट वेगानं धावणारी वाहन सातत्याने पादचाऱ्यांसह दुचाकी स्वारांचे देखील बळी घेत असल्याचे निदर्शनास येत असून या अनियंत्रित बेजवाबदार वाहन चालकांवर प्रशासनासह प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे देखील कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने या मार्गावर सातत्याने अपघात होऊन निष्पाप लोकांचे बळी जात आहेत असाच एक गंभीर प्रकार दा.१० मार्च २०२३ रोजी सायंकाळी ०६-३० ते ०७-०० वाजेच्या सुमारास या राज्य महामार्गावरील पिंपळा भत्या जवळील पुलाच्या अलीकडे घडली आपल्या मोटारसायकल वर नांदेड येथून पुर्णाकडे येणाऱ्या पती पत्नीस नांदेडकडे जाणाऱ्या एका सुसाट वेगाने धावणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने उडविल्याने मोटारसायकलवरील पत्नीला डोक्यास गंभीर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर या घटनेत पती देखील जखमी झाला या प्रकरणी आज सोमवार दि.१३ मार्च २०२३ रोजी चुडावा पोलिस स्थानकात अज्ञात कार चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चुडावा पोलिस सूत्रा कडून मिळालेल्या माहीत वरून दि.१० मार्च २०२३ रोजी पुर्णेतील रेल्वेच्या इलेक्ट्रीक विभागात काम करणारे शेख सलीम शेख महेबुब हे आपल्या पत्नी सोबत सायंकाळी ०६-३० ते ०७-०० वाजेच्या दरम्यान आपल्या मोटारसायकल क्रमांक एम.एच - २२ ए.जे ९६०८ या मोटारसायकलवर नांदेड हुन पुर्णाकडे येत होते नांदेड पूर्णा रस्त्यावरील पिंपळा भत्या जवळील पुलाच्या अलीकडे समोरून पूर्णा कडून सुसाट वेगाने धावणाऱ्या स्विप्ट डिझायर कारने उडविले यात शेख सलीम एका बाजूला तर त्यांची पत्नी रेश्मा रस्त्यावर पडले तेव्हा सदर कार चालकाने आपली कार रिव्हस घेऊन रेश्मा याच्या अंगावरून घालत फरार झाला या घटने मध्ये पत्नी रेश्मा याचे डोक्याला गंभीर मार लागला तर शेख सलिम यांच्या पायाला हाताला मार लागले तेव्हा दोघांना आजूबाजूच्या लोकांनी आणि नातेवाईकानी मिळून पुर्णा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले तेव्हा डॉक्टरानी पत्नी रेश्मा यांचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले आणि शेख सलीम याचा उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून घेतले नंतर थोडी फार तब्बेत ठीक झाल्याने शेख सलीम शेख महेबुब यांनी दि 13 मार्च रोजी सकाळी चुडावा पोलिस ठाणे गाठून सदर प्रकरणी फिर्याद दाखल केल्याने आरोपी अज्ञात कार चालका विरोधात चुडावा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या