🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/बातम्या.....!


🌟मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यभरात काढणार शिवधनुष्य यात्रा🌟

 ✍️ मोहन चौकेकर

* माणसाच्या मृत्यूनंतर अवयवदान केल्यामुळे आठ ते दहा जणांना नवीन जीवन मिळण्याची शक्यता, त्यामुळे अवयव दान करा : नरेंद्र मोदी

* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी भेटीला,भेटीचे कारण अद्याप समोर आले नाही ; मात्र राजकीय चर्चेला उधाण

* नागालँडप्रमाणे देशाच्या विकासासाठी शरद पवारांनी एनडीए सोबत यावे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन                                                            ‌         

* अली जवाब हे उद्धव ठाकरेंना भूषणावह वाटते का ? देवेंद्र फडणवीस यांचा खोचक सवाल                                                                                                                 ‌                        * विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शिंदे गटाच्या संपर्कात ; आमदार संजय शिरसाट यांचा मोठा गौप्यस्फोट ; मी तुमच्यासारखा गद्दार नाही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा संजय शिरसाट यांच्यावर पलटवार 

* इस्त्रोंने 36 वनवेब उपग्रहाचे यशस्वीपणे उड्डाण केले

* अमेरिकेतील मिसिसिपीला चक्रीवादळाचा तडाखा, 23 नागरिकांचा मृत्यू, अनेक जण बेघर

* राहुल गांधींनी मनाचा मोठेपणा दाखवावा अन् OBC समाजाची माफी मागावी, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटलांची मागणी

* भंडारा जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका. रविवारी दुपारी २:५० वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात.

* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यभरात काढणार शिवधनुष्य यात्रा. आठ किंवा नऊ एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर शहरातून धनुष्यबाण यात्रेला होणार सुरुवात

* ७ हजार परीक्षार्थ्यांनी दिली सेट परीक्षा, दीड हजार गैरहजर

* महिलांना ST सवलतीच्या निर्णयाचा फेरविचार करा; लाखो वाहतूकदारांचा रोजगार हिरावला, रयत क्रांतीचे निवेदन

* मोठी बातमी ; सोलापूर शहरात कोरोना वाढतोय, रूग्णसंख्या पोहोचली ४१ वर 

* पिठाच्या गिरणीत ओढणी अडकल्याने महिलेचा मृत्यू , लातुरातील घटना

* भारतीय बॉक्सर नीतू घंघासची वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण कामगिरी, मंगोलियाच्या खेळाडूला हरवले

* कायदा-सुव्यवस्थेचे वाजले तीन-तेरा! लोकलमध्ये दिव्यांगला जाळण्याचा प्रयत्न मुंब्रा स्थानकाजवळ घडली घटना

* परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढा अडकणार लग्नबंधनात ?

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री परिणिती चोप्रा तिच्या सिनेमांमुळे नव्हे तर वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आले आहे. परिणिती काही दिवसांपूर्वी सलग दोन वेळा 'आप'चे नेते राघव चड्ढा यांच्यासोबत स्पॉट झाली. त्यांचे काही व्हिडिओ आणि राघव चड्ढा यांची यावरील प्रतिक्रियाही व्हायरल झाली होती. त्यानंतर आता परिणिती आणि राघव लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचेही बोलले जात आहे.

* स्वीटी बुरा हिने महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या 81 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले

स्वीटी बुरा हिने महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या 81 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले आहे. भारतासाठी तिने या स्पर्धेत दुसरे सुवर्णपदक जिंकले आहे. तिने तिच्या लग्नानंतर लगेच १० दिवसात सराव चालू केला होता. यासाठी तिला पतिची मोठी साथ मिळाली.

* हरियाणाची युवा बॉक्सर नीतू घनघासने महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला

हरियाणाची युवा बॉक्सर नीतू घनघासने महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला आहे. 45-48 किलो गटात सुवर्णपदक जिंकत ती पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियन बनली आहे.

* उजनीतील वाळू व गाळ उपसा केल्यास ५१ हजार कोटींचा महसूल मिळण्याची अपेक्षा

उजनी धरणात १३ टक्के गाळ असल्याचा दावा यंत्रणांनी केला असून गाळ काढल्यास साडेसहा टीएमसी पाणीसाठा वाढण्याची शक्यता आहे. ९९ कोटी ब्रास वाळू व ६० कोटी ब्रास गाळ असल्याचेही अहवालात नमूद आहे. उजनीतील वाळू उपसा केल्यास ५१ हजार कोटींचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.

* राहुल गांधी माफी मागा”, पत्रकार अवमानप्रकरणी मुंबई प्रेस क्लबची मागणी

खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. यावेळी राहुल गांधींनी एका प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला फटकारलं तुम्ही थेट भाजपासाठी का काम करता ? भाजपासाठीच काम करायचं असेल तर छातीवर भाजपाचा बिल्ला लावा. स्वत:ला पत्रकार असल्याचं भासवू नका, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली.

याप्रकरणी आता मुंबई प्रेस क्लबने आक्रमक भूमिका घेतली आहे. शनिवारी काँग्रेसच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकाराचा सार्वजनिक अपमान केल्याबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी मुंबई प्रेस क्लबने केली आहे.                       

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या