🌟दिव्यांगासाठी कुठेही कमी पडणार नाही - आमदार मेघना बोर्डीकर


🌟जिंतूरात दिव्यांगाना साहित्य वाटपावेळी बोलतांना आ.बोर्डीकर यांनी केले प्रतिपादन🌟

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग महिला पुरुष लहान बालक यांना आवश्यक त्या साहित्याच व जयपूर फूट आणि मुक बधीर यांना अँड्रॉइड मोबाईल च वाटप आज जिंतूर येथे भारतीय जनता पार्टीच्या जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघाचे आमदार मेघना दीदी बोर्डीकर साकोरे यांच्या हस्ते सातशे 747 लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले यावेळी बोलताना मेघना बोर्डीकर म्हणाल्या जिंतूर सेलू मतदारसंघात तसेच काय परभणी जिल्ह्यातील अपंगांच्या पाठीशी मदतीसाठी मी सदैव तत्पर असून मी त्यांच्या साठी कुठेही कमी पडणार नाही आज जिंतूर येथील बोर्डीकर पोतदार इंग्लिश स्कूलच्या भव्य मैदानावर दिव्यांग साहित्याचे वाटप करण्यात आलं पात्र लाभार्थ्यांची निवड यापूर्वी घेतलेल्या अपंगाच्या शिबिरात करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली सुमारे ७२७ लाभार्थ्यांना आज इलेक्ट्रिक सायकल तीन चाकी सायकल जयपूर फूट कुणाला हाताचे व पायाचे मोजमाप करून दिल्यानंतर जयपूर फूट मागून तर काहींना अँड्रॉइड मोबाईल वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी जिंतूर सेलू मतदारसंघातील शेकडो लाभार्थी यांनी गर्दी केली तर नोंदणी न केलेल्या व प्रत्यक्ष दिव्यांग असलेल्या व्यक्तींनीही या ठिकाणी मोठी गर्दी केली होती त्यांच्यासाठी लवकरच अपंगाचे तपासणी शिबिर घेऊन त्यांना आवश्यक त्या साहित्याची नोंदणी करून ते साहित्य येत्या दोन महिन्यात मागविण्यात येईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले जिंतूर सेलू मतदारसंघातील या लाभार्थ्यांना सुमारे एक कोटी रुपयाचे साहित्य आज या ठिकाणी वाटप झाल्याचे सांगण्यात आले कार्यक्रमाच्या व्यासपीठावर भाजपाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण दादा बुधवंत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप कोकडवार डॉक्टर पंडित दराडे प्रदीप चौधरी महिला आघाडी च्या सौ बार्शीकर ताई शहर अध्यक्ष सौ.निर्मलाताई  बांडे ताई यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित होती संचलन भगत सर तर आभार मेटांगले सर यांनी मानले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या