🌟पुर्णा तालुक्यातील चुडावा पोलिस स्थानकाच्या हद्दीत चोऱ्या घरफोड्यांचे प्रमाण वाढले....!


🌟रुपला पांढरी येथे अज्ञात चोरट्यांनी केलेल्या दोन जबरी घरफोड्यांमध्ये ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास🌟

पूर्णा (दि.२३ मार्च) - तालुक्यातील चुडावा पोलिस स्थानकाच्या हद्दीत चोऱ्या/घरफोड्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास येत असुन चुडावा पोलिस स्थानकाच्या हद्दीतील मौ.रूपला पांढरी येथे दि.२१ मार्च २०२३ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एकाच रात्रीत दोन घरफोड्या झाल्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.


या घटने संदर्भात चुडावा पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार रुपला पांढरी येथील रहिवासी सिद्धार्थ दत्तराव नरवाडे यांच्या घरात दा.२१ मार्च २०२३ रोजी रात्रीच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश करीत आलमारीचे लॉकर तोडून त्यातील सोने/नगदी रक्कम आदी एकून ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल पळवला या घटने संदर्भात आज्ञात चोरट्यां विरोधात चुडावा पोलिस स्थानकात बुधवार दि.२२ मार्च २०२३ रोजी तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

तालुक्यातील रूपला पांढरी येथील राहणारे सिद्धार्थ दत्ताराम नरवाडे वय ३५ वर्ष हे जनाई सेमी इंग्लिश स्कूल हिवरा येथे शिक्षक म्हणून कार्यरत असून काही आज्ञात चोरट्याकडून त्यांच्या घराची दि २१ मार्च २०२३ रोजी अंदाजे रात्री १०:०० ते दि २२ मार्च २०२३ रोजी च्या रात्री ०२:०० वा दरम्यान त्यांच्या घरातील कपाटां मधील ५० रु च्या २०० नाेटा, २० रु च्या १०० नोटा , व ५०० रु च्या २६ नोटा असा एकून २५००० रु. नगदी व त्यांच्या आईचे सोन्याचे वापरते दागिने सेवनपीस ची एक पोत दहा ग्राम किंमती ५०००० रु. ची व कानात घालायचे सोन्याचे फुल चार ग्राम किमती २००००. चे असा एकून ९५,००० रु. चा माल  अज्ञात चोरटयाने घराची कडी कोडा तोडून घरात प्रवेश करुन माल चोरुन नेला आहे तर त्यांच्या घरा शेजारी असलेल्या  राहणारी माझ्या भावकीतील सुमनबाई संभाजी नरवाडे हिचा घरी सुदधा सकाळी ०५ : ०० वाजता चोरी  झाल्याचे सुमनबाई यांनी सांगितले गेले या दोन्ही घराच्या चोरी झालेल्या अज्ञात चोरट्यां विरोधात चुडावा पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली असून या आज्ञात चोरट्या चुडावा पोलीस प्रशासना कडून तपास सुरू आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या