🌟कौशल्य विकासविषयक प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा - सहायक आयुक्त


🌟परभणी जिल्ह्यातील शेतकरी,आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे वारस तसेच इतर सुशिक्षीत बेरोजगारांना संधी🌟

    परभणी (दि.०१ मार्च) : जिल्ह्यातील शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे वारस तसेच इतर सुशिक्षीत बेरोजगारांनी राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभाग व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडून कौशल्यविषयक प्रशिक्षण देण्यात येणार असून, गरजू व पात्र व्यक्तींनी याचा लाभ घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त प्रशांत खंदारे यांनी केले आहे. 

किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन २०२२-२३ योजनेअंतर्गत आगामी कौशल्य विकास प्रशिक्षणात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामार्फत मधुमक्षितका पालन, रेशीम उद्योग, फळांपासून पेय व ज्यूस तयार करणे, फळांच्या गरापासून विविध पदार्थ तयार करणे, विविध प्रकारचे मसाले तयार करणे तसेच कृषी विज्ञान केंद्र जिंतूर रोड, मार्फत कुक्कुपटपालन आणि शासकीय उपजिल्हा रुग्णालय, सेलू यांच्यामार्फत वार्डबॉय आदी ७ कोर्सेसमध्ये मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

कृषी क्षेत्रातील प्रत्येक अभ्यासक्रमासाठी ६० व इतर कोर्ससाठी प्रत्येकी ३० असे एकूण ३६० शेतकरी, शेती व्यवसाय करणारे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे वारस तसेच इतर सुशिक्षीत रोजगारांचे कौशल्य विकास प्रशिक्षण मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरु करण्यात येणार आहेत.

तरी परभणी जिल्ह्यातील १८ ते ४५ वयोगटातील महिला, पुरुषांनी वरील प्रशिक्षणात प्रवेश घेण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी येथे संपर्क साधण्याचे आवाहन विभागाचे सहायक आयुक्त प्र. सो. खंदारे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ (किटकशास्त्र विभाग, अन्न व तंत्र महाविद्यालय), कृषी विज्ञान केंद्र, परभणी व इतर प्रशिक्षण संस्था किंवा सहायक आयुक्त, कौशल्य विकास यांच्या (९४२०७८८७४७), सुमित दीक्षित (९८९०८२८७९७), प्र. सु. रुद्रकंठवार (९८६००१५३८३) ०२४५२-२२००७४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या