🌟सर्वधर्मीय फुले सेवा आंबेडकर जयंती महोत्सवाच्या अध्यक्षपदी सूर्यकांत हाके यांची निवड....!


🌟तर स्वागताध्यक्ष पदावर सुदर्शन फुलपगार यांची निवड : विधायक उपक्रमाने साजरा होणार जयंती महोत्सव🌟  


परभणी -: (दि.30 मार्च) - सर्वधर्मीय फुले शाहू आंबेडकर जयंती महोत्सव 2023 चे अध्यक्षपदी सूर्यकांत हाके तर स्वागताध्यक्ष पदी सुदर्शन फुलपगार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली विश्वकर्मा महाविद्यालय बसवेश्वर चौक येथे माजी अध्यक्ष सचिन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत सर्वांनुमते ही निवड करण्यात आली. जातीअंताची लढाई लढणाऱ्या महानायकांच्या विचारातून राष्ट्राच्या महासत्तेच्या महामार्ग प्रशस्त होतो ही भूमिका घेऊन गत 13 वर्षापासून सर्वधर्मीय नागरिकांच्या सामूहिक समन्वयातून महोत्सवाची परंपरा सुरू आहे. 
*क्रांतीबा फुले अभिवादन, ,विचार प्रवर्तक देखावा,आंतरराष्ट्रीय विचार उत्सव,राज्यस्तरीय विद्रोही कवि संमेलन,18 तास अभ्यास अभियान,सम्यक जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा, आदर्श भीम जयंती मंडळ पुरस्कार, जयंती मंडळांना संविधान भेट, विविध सांस्कृतिक स्पर्धा, लेझीम पथक, हेल्मेट सक्ती /वापर अभियान,यासह व्याख्यान परिसंवाद,आरोग्य शिबिर,अनाथ आश्रम व वृद्धाश्रम भीम जयंती निमित्त मिठाई वाटप*, आदि विधायक संकल्पाने महोत्सव साजरा करण्याचे ठरविण्यात आले.
या बैठकीत मिलिंद सन्मान पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल डॉक्टर सुरेश शेळके, राष्ट्रपती पदक प्राप्त परमेश्वर जवादे,आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त त्रंबक वडसकर, यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीचे प्रास्ताविक महोत्सवाचे निमंत्रक यशवंत मकरंद यांनी तर सूत्रसंचालन सुधीर साळवे यांनी केले.महोत्सवातील विविध उपक्रमा बाबत सुभाष ढगे, सलीम इनामदार, रवी पुराणिक,सुनिता साळवे, डाॅ. सुनील जाधव, यांनी महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या या बैठकीत निमंत्रक यशवंत मकरंद, डॉक्टर सुनील जाधव, प्राध्यापक डॉक्टर सुरेश शेळके, सुनील ढवळे, संजीव आढागळे,निशांत हाके,दीपक पंचांगे, त्रंबक वडस्कर   यांच्यासह नारायण कदम, सरफराज अब्दुल,दिगंबर जाधव, प्रेमानंद बनसोडे, कदम परमेश्वर जवादे, दिगंबर देवकते, शाहीर नामदेव लहाडे, शाहीर भगवान वाघमारे, शाहीर भीमराव वाघमारे, घनश्याम साळवे, जयश्रीताई पुंडगे,रेखा मनेरे, ठोंबरे एस डी,सुशीला चव्हाण, संघपाल आढागळे,रवी साबळे, प्रमोद अंभोरे,सुधीर साळवे,अझहर शेख,नितीन जाधव महाराज, एडवोकेट राजेंद्र ताटे, सिद्धांत सूर्यवंशी,भूषण मोरे, दिलीप बनकर, शाहीर मोहन जोंधळे यांच्यासह विविध सामाजिक संघटनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी सुनील ढवळे यांनी आभार प्रदर्शन केले......                                            

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या