🌟पुर्णा तालुक्यात ४७ दिव्यांगाना अंतोदय योजनेतील पिवळे रेशन कार्डचे मोफत वाटप.....!


🌟प्रहार जनशक्ती पक्ष शाखा पूर्णा चा उपक्रम🌟

परभणी (दि.१५ मार्च) - प्रहार जनशक्ती पक्ष शाखा पूर्णेच्या वतीने पूर्णा तालुक्यातील ग्रामीण भागातील ४७ दिव्यांग बंधू भगिनींना मोफत अंतोदय योजनेतील रेशन कार्डचे वाटप करण्यात आले असून आज पर्यंत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पूर्णा तालुक्यातील ग्रामीण भागातील १४५ दिव्यांगांना व शहरी भागातील १५५ दिव्यांग, विधवा भगिनी व भिक्षेकरी गोर गरीबांना अंतोदय व अन्न सुरक्षा योजने अंतर्गत प्राधान्य गटाचे रेशन कार्ड चे मोफत वाटप करण्यात आले.शासकीय विश्राम गृह पुर्णा येथे झालेल्या आजच्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या लाभार्थी रेशन कार्ड धारकांना प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी मार्गदर्शन केले. 

या वेळी ग्रामीण भागातील दिव्यांग पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शहर प्रमुख संजय वाघमारे यांनी केले. कार्यक्रमाला प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, उपजिल्हा प्रमुख नरेश जोगदंड, पूर्णा तालुका प्रमुख शिवहार सोनटक्के, शहर प्रमुख संजय वाघमारे, श्रीहरी इंगोले, सुरेश वाघमारे, राम सुके, मदन भोसले, शिवसांब कोटे, हौसाजी तरासे, बाबुराव सोलव, चांदू सोलव, व्यंकटी डाखोरे, आयुब शाह, सलीम शहा, अहमद शहा इत्यादी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या