🌟गंगाखेड तालुका कॉंग्रेस पक्षाकडून काळ्या मुखपट्ट्या बांधून सरकारचा निषेध....!


🔹शिवसेना,राष्ट्रवादी,भाकपचा सहभाग 🔹

गंगाखेड (दि.२७ मार्च) : कॉंग्रेसनेते राहुल गांधी यांच्या संसदेतील निलंबनाचा गंगाखेड कॉंग्रेसकडून निषेध नोंदवण्यात आला. तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून हुकूमशाही पद्धतीने वागणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र सरकारची ही एकाधिकारशाही थांबविण्याची मागणी राष्ट्रपतींना निवेदन देवून करण्यात आली. या निषेध आंदोलनात कॉंग्रेससह शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाकपचे प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते. 


राहुल गांधी यांना आधी संसदेत बोलू दिले नाही. नंतर ते जे बोलले, ते कामकाजातून वगळण्यात आले. आता तर एका निकालाचा आधार घेवून त्यांचे संसद सदस्यत्वच रद्द करण्यात आले. हा प्रकार म्हणजे विरोधीपक्ष आणि पर्यायाने सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. या कार्यवाही मुळे देशातील जनता अस्वस्थ झाली असून हे प्रकार न थांबल्यास देशातील लोकशाही मानणारा प्रत्येक नागरिक राहुल गांधी होवून रस्त्यावर ऊतरेल, असा ईशारा या प्रसंगी बोलताना कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी दिला. 

कॉंग्रेस जिल्हा ऊपाध्यक्ष ॲड. संतोष मुंडे, ॲड हनुमंत जाधव, शिक्षक सेनेचे मराठवाडा सरचिटणीस बाळासाहेब राखे, महिला कॉंग्रेसच्या प्रदेश प्रतिनिधी प्रा. शुभांगी शिसोदीया, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानसभा अध्यक्ष श्रीकांत भोसले, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, शिवसेना तालुकाप्रमुख अनिल सातपुते, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष माधव भोसले, कॉंग्रेस शहराध्यक्ष शेख युनूस, भाकपचे सरचिटणीस ओंकार पवार,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष जगन्नाथ जाधव, शिवसेना शहरप्रमुख जीतेश गोरे, धोंडीराम जाधव, युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सिद्धोधन भालेराव, नागनाथ डमरे, अल्पसंख्यांक सेलचे मराठवाडा ऊपाध्यक्ष मुशरफ खान, निलेश टोंपे, माजी जि. प. सदस्य माऊली व्हावळे, माजी नगरसेवक प्रमोद मस्के, बिबनखान पाठाण, अजू शेख, शिवा घोबाळे, खलीऊल्ला चाऊस आदिंसह बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या