🌟पूर्णा न्यायालयाच्या न्यायाधीश मा.श्रीमती मेघा व्हि.पौळ यांनी महिलांचा मालकी हक्क या विषयी केले महिलांना मार्गदर्शन...!


🌟सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून करण्यात आले होते कार्यक्रमाचे आयोजन 🌟


पूर्णा (दि.१२ मार्च) : महिला आर्थिक विकास महामंडळ ( माविम )जिल्हा कार्यालय परभणी, नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत संघर्ष लोकसंचालित साधन केंद्र पूर्णा व तालुका विधी सेवा समिती तर्फे दि. 10 मार्च 2023 रोजी सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.


लोकसंचालित साधन केंद्र विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने.. संयुक्त मालकी हक्क प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणास पूर्णा न्यायालयाच्या न्यायाधीश मा.श्रीमती मेघा व्हि. पौळ यांनी महिलांना मालकी हक्का विषयी महिलांना मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित .श्रीमती नीता अंभोरे जिल्हा समन्वय अधिकारी माविम परभणी, मा.बी. जी. लोखंडे ग्रामसेवक मा.श्रीमती विजयालक्ष्मी बळवंत तलाठी, सि.एम.आर.सी.अध्यक्षा मा.श्रीमती अरुणा गंजिले  सचिव मा.श्रीमती विजया भोसले, अॅड.बी आर. लोखंडे, अॅड.संजय माकोने,  अॅड.एस एस नागठाणे विधिसेवा समिती प्रमुख, परमेश्वर मुनेश्वर व्यवस्थापक संघर्ष लोकसंचलित साधन केंद्र पूर्णा सि.एम.आर.सी ,सि.आर.पि व आर.जि.बी सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रम चे सूत्रसंचालन विद्या शृंगारे यांनी केले. तर आभार प्रदर्शन सुनीता सोनावणे यांनी केले. हे प्रशिक्षण व्यवस्थित पार पाडण्यासाठी शारदा कच्छवे, मीरा धुमाळे व गौतमी अहिरे यांनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या